---Advertisement---

IND vs ENG: इंग्लंड अजूनही संघर्षात; टीम इंडियासमोर तिसऱ्या दिवशी मोठं आव्हान

On: रविवार, जून 22, 2025 11:30 AM
---Advertisement---

लीड्स येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर मजबूत आघाडी घेतली असली, तरी दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने चांगली झुंज दिली आहे. भारताच्या 471 धावांच्या डावाच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 गड्यांच्या बदल्यात 209 धावा केल्या. ओली पोपने शानदार शतक झळकावत (100*) इंग्लंडला सावरले असून, मैदानात अजूनही त्यांची लढत सुरू आहे. दुसऱ्या टोकाला हैरी ब्रूक नाबाद असून त्याने अजून खाता उघडलेला नाही. भारत सध्या 262 धावांनी आघाडीवर आहे.

दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने आक्रमक सुरुवात करत झॅक क्रॉलीला अवघ्या 4 धावांवर तंबूत पाठवले. त्यानंतरही बुमराह आणि मोहम्मद सिराजने अनेक संधी निर्माण केल्या, मात्र खराब फील्डिंगमुळे भारताला महत्त्वाचे झेल मिळवता आले नाहीत. विशेषतः दिवसाच्या अखेरच्या षटकात ब्रूकचा झेल घेतला असला, तरी ती चेंडू नो बॉल ठरली आणि भारताला महत्त्वाचा बळी गमवावा लागला.

भारतीय संघाला तिसऱ्या दिवशी सामना आपल्या बाजूने झुकवायचा असेल, तर पहिल्या सत्रातच 1-2 विकेट मिळवणे अत्यावश्यक ठरेल. बुमराह आणि सिराजची जोडी प्रभावी कामगिरी करत असेल, तर इंग्लंडला 100 धावांच्या आत काही गडी गमवावे लागतील. याशिवाय फील्डिंगमध्ये चुका टाळणे आणि झेल सोडू न देणे हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय संघासाठी तिसरा दिवस निर्णायक असून, लवकरात लवकर विकेट घेऊन इंग्लंडचा डाव गुंडाळणे हाच विजयाचा मार्ग ठरू शकतो.

भारतीय संघ अजूनही सामन्यावर पकड ठेवून आहे. मात्र ओली पोपचा फॉर्म आणि इंग्लंडची खंबीर फलंदाजी लक्षात घेतल्यास तिसऱ्या दिवशी निर्णायक भागीदारी तोडणं आणि टॉप ऑर्डरला तातडीने गुडूप करणं हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---