---Advertisement---

IND vs ENG: हार्दिक पांड्याची ती चूक पडली महागात, नाही तर सामन्याचा निकाल वेगळा असता?

On: बुधवार, जानेवारी 29, 2025 1:52 PM
---Advertisement---

राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा पराभव झाला. इंग्लंडने हा सामना 26 धावांनी जिंकला. भारताकडून हार्दिक पांड्याने 40 धावांची महत्त्वाची खेळी खेळली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. जर पांड्या शेवटपर्यंत राहिला असता तर टीम इंडिया जिंकू शकली असती. पण त्याची एक चूक संपूर्ण संघासाठी महागात पडली. सामन्यादरम्यान पांड्याने एक धाव घेतली नाही. ज्यामुळे मोठी पांड्याकडून मोठी चूक घडली.

खरंतर हार्दिक पांड्या भारताकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने 35 चेंडूंचा सामना करत 40 धावा केल्या. पांड्याच्या या खेळीत 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. 19 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पांड्या बाद झाला. जिमी ओव्हरटनने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

पांड्यासोबत दुसऱ्या टोकाला ध्रुव जुरेल होता. 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जुरेलने शॉट खेळला आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिक पांड्या धावला नाही. यानंतर 19 वे षटक सुरू झाले आणि ओव्हरटनने पांड्याला बाद केले. 19 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पांड्या जोस बटलरला झेल दिला. जर हार्दिक पांड्या शेवटपर्यंत राहिला असता तर भारत जिंकू शकला असता.

राजकोटमध्ये इंग्लंडने भारताला विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य दिले होते. पण टीम इंडियाला या सामन्यात फक्त 145 धावा करता आल्या. या सामन्यात भारतीय फलंदाजांना काही खास कामगिरी करता आली नाही. संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर संजू सॅमसन फक्त 3 धावा करून बाद झाला. अभिषेक शर्माने 14 चेंडूत 24 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव फक्त 14 धावा करून बाद झाला. तिलक वर्माही या सामन्यात काही खास करु शकला नाही.

तत्पूर्वी, इंग्लंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना मार्यादित 20 षटकात 171 धावा केल्या. ज्यात सलामीवीर बेन डकेटने अर्धशतक केले. लियाम लिव्हिंगस्टोन व्यतिरिक्त मध्यल्या फळीतील फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. लियामने 43 धावा करत संघाचा स्कोअर 170+ करण्यात मोलाचे योगदान दिले. तर भारताकडून गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा-

SL vs AUS; स्टीव्ह स्मिथचा भीमपराक्रम, खाते उघडताच रचला इतिहास, सचिन-द्रविडला टाकलं मागे
वरुण चक्रवर्तीने अश्विन आणि बिश्नोईचा विक्रम मोडला, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
14 महिन्यांनी मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला, अशी होती कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---