भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 353 धावा फलकावर लावल्या आहेत.अनुभवी फलंदाज जो रूटने शतक ठोकत इंग्लिश संघाला ही धावसंख्या गाठण्यात मोलाचा वाटा उचलला. भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 307 धावांवर आटोपला होता. त्यानंतर रविचंद्रन अश्विनने बेन फोक्सला 17 तर जेम्स अँडरसनला शुन्यावर बाद करत भारताने इंग्लंडचा दुसरा डाव 145 धावांवर संपवला. इंग्लंडकडे दुसऱ्या डावात 191 धावांची आघाडी असून भारताला सामना जिंकण्यासाठी अजून 152 धावांची गरज आहे.
याबरोबरच, टीम इंडियाला 353 धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात 307 धावांवर रोखल्याने इंग्लंडने 46 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडने या आघाडीच्या मदतीने दुसऱ्या डावात ऑलआऊट 145 धावा केल्या. इंग्लंडकडून ओपनर झॅक क्रॉली याने सर्वाधिक 60 धावा केल्या. तर जॉनी बेयरस्टो याने 30 धावाचं योगदान दिलं. बेन फोक्स याने 17, बेन डकेट याने 15 आणि जो रुट याने 11 धावा केल्या. तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर तिघे आले तसेच परत गेले. शोएब बशीर 1 धावेवर नाबाद राहिला आहे.
तसेच, टीम इंडियाकडून आर अश्विन याने सर्वाधिक 5 विकेट्स घेत इंग्लंडचा ‘पंच’नामा केला. तर कुलदीप यादव याने इंग्लंडच्या चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर रवींद्र जडेजाच्या खात्यात 1 विकेट घेतली आहे. त्यानंतर 192 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल नाबाद राहिले असून भारतीय संघाला चौथी कसोटी जिंकण्यासाठी 152 धावांची गरज आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.
महत्वाच्या बातम्या –