चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना 22 जानेवारी रोजी कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाईल. पण याआधी आक्रमक फलंदाजी शैली ‘बॅजबॉल’चे जनक असलेले इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत त्यांचा संघ अतिशय सावधगिरीने खेळेल असे सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम म्हणाला की, मला माहित आहे की हा दौरा कठीण असणार आहे. कारण आपण एका मजबूत भारतीय संघाचा सामना करत आहोत. परंतु मला विश्वास आहे की आमचा संघ सावध शैलीचे क्रिकेट खेळेल. याशिवाय कर्णधार जाॅस बटलर या मालिकेत कर्णधार आणि फलंदाज म्हणून खेळेल. तो या मालिकेत यष्टीरक्षण करणार नाही. तसेच आम्हाला हे दोन महिन्यांपूर्वीच कळले होते की, चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी ही एक उत्तम आणि रोमांचक मालिका असेल.
मॅक्युलम मे 2022 पासून इंग्लंड कसोटी संघाचा प्रशिक्षक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक चांगले यश मिळवले आहे. मात्र, भारताविरुद्धच्या मालिकेत तो मर्यादित षटकांच्या स्वरूपात प्रथमच ही जबाबदारी स्वीकारेल.
🚨 NEWS ALERT 🚨
Brendon McCullum confirms that Jos Buttler won’t be keeping wickets in the T20I series against India. 🏴🏏#Cricket #England #JosButtler #INDvENG pic.twitter.com/uFwpemzooC
— Sportskeeda (@Sportskeeda) January 20, 2025
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचे वर्चस्व आहे. कारण आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 24 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारतीय संघाने 13 तर इंग्लंडने 11 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील शेवटचा टी20 सामना 2024 च्या टी20 विश्वचषकाचा उपांत्य सामना होता. ज्यामध्ये भारताने 68 धावांनी विजय मिळवला.
भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेनंतर इंग्लंडचा संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळेल. पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर ही एकदिवसीय मालिका खूप महत्त्वाची असेल. यामुळे दोन्ही संघांना तयारी करण्याची आणि त्यांच्या संघ संयोजनात सुधारणा करण्याची संधी मिळेल. भारताने दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तर इंग्लंडने एकदाही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली नाही.
हेही वाचा-
IPL 2025; 7 संघांच्या कर्णधाराची घोषणा! आरसीबी, केकेआरसह दिल्लीही कर्णधाराच्या शोधात
रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल रिषभ पंतची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला…
रिषभ पंतनंतर अजिंक्य रहाणेही झाला कर्णधार, ‘या’ संघाची धुरा सांभाळणार