इंग्लंडने पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडिया विरुद्ध धर्मशाला येथे टॉस जिंकत इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. तर इंग्लंडने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. तर टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केलेत. टीम इंडियाकडून एका युवा खेळाडूला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर आर अश्विन याचा हा कसोटी कारकीर्दीतील 100 वा सामना आहे.
याबरोबरच, कुलदीप यादव याने बेन डकेट याला 27 धावांवर आऊट करत टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर टीम इंडियाच्या फिरकी जोडीने ठराविक अंतराने झटके देत इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं. तसेच कुलदीप यादव याने इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याला आऊट करत पाचवी विकेट पूर्ण केली. कुलदीपच्या कसोटी कारकीर्दीत 5 विकेट्स घेण्याची ही चौथी वेळ ठरली आहे.
तसेच पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने इंग्लंडचा पहिला डाव संपवला असून पहिल्या दिवसाची दोन सत्रे कशीबशी खेळणाऱ्या इंग्लंडचा संपूर्ण संघ 218 धावात गारद झाला आहे. तर भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवने 5 तर आपला 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या अश्विनने 4 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच जडेजाला एक विकेट मिळाली आहे.
दरम्यान, इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्राऊलीने सर्वाधिक 79 धावा केल्या. तर अश्विनप्रमाणेच आपला 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टेने 29 धावांचे योगदान दिले आहे.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : कुलदीप यादवचा पंजा..! इंग्लंड नेस्तानाबूत, भारतीय संघ मजबूत स्थितीत
- सरफराजचं ऐकलं असतं तर झॅक क्रॉली 79 धावा करूच शकला नसता, पाहा रोहित शर्मा कुठे चुकला