इंग्लंडचा भारत दौराक्रिकेटटॉप बातम्या

IND vs ENG : कुलदीप यादवचा पंजा..! इंग्लंड नेस्तानाबूत, भारतीय संघ मजबूत स्थितीत

पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडिया विरुद्ध धर्मशाला येथे टॉस जिंकत इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. तर इंग्लंडने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. तर टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केलेत. टीम इंडियाकडून एका युवा खेळाडूला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर आर अश्विन याचा हा कसोटी कारकीर्दीतील 100 वा सामना आहे. 

याबरोबरच, कुलदीप यादव याने बेन डकेट याला 27 धावांवर आऊट करत टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर टीम इंडियाच्या फिरकी जोडीने ठराविक अंतराने झटके देत इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं. तसेच कुलदीप यादव याने इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याला आऊट करत पाचवी विकेट पूर्ण केली आहे.

रविचंद्रन अश्विनने आपल्या 100व्या कसोटीत एकाच षटकात दोन विकेट घेत आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने इंग्लंडच्या डावाच्या 50 व्या षटकात टॉम हार्टले आणि मार्क वुडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.

कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.

महत्वाच्या बातम्या – 

Related Articles