इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकाल विराट कोहली मुकला. वर्षाच्या सुरुवातील भारतीय संघ ही मालिका मायदेशात खेळत आहे. पण इंग्लंडसाराखा बलाढ्य संघ संघ समोर असताना विराट कोहली याच्यासाराखा तगडा फलंदाज संघातून बाहेर आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांपाठोपाठ शेवटच्या तीन सामन्यांतून देखील माघार घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने खास प्रतिक्रिया दिली.
शनिवारी (10 फेब्रुवारी) बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटीसाटी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात विराट कोहली याचे नाव नव्हते. तत्पूर्वी पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधूनही विराटने वैयक्तिक कारण देत माघार घेतली होती. यावेळीही त्याने अगदी हेच कारण दिले. विराट न खेळण्यामागचे नेकमे कारण चाहत्यांना माहिती नाहीये. असात वेगवेगळे प्रश्न आणि अंदाज वर्तवले जात आहेत. शनिवारी संघ घोषित होण्याआही विराटविषयी माध्यमांमध्ये सर्वत्र चर्चा सुरू होत्या. अशातच माजी दिग्गज डेल स्टेन यानेही प्रतिक्रिया दिली.
एका माध्यावर डेल स्टेन नुकताच म्हणाला की, “कुटुंब सर्वात महत्वाचे आहे. माफ करा पण ते तसेच आहे. माझ्याकडे तीन कुत्री आहेत. त्यातील एक आजारी पडला होता, तेव्हा मी आयपीएलमधून माघार गेतली होती. मी विमानात उड्या मारत होतो आणि मला माझ्या कुत्र्यांना पाहायचे होते. त्यामुळेच तर ते माझे कुटुंब आहेत. जर विराटने घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे, तर त्याला पत्नीसोबत रहायला आहे. तो दुसऱ्यांना वडील बनणार असेल, तर यात मला चुकीचे काहीच वाटत नाही. त्याने अनेक वर्ष भारतीय संघाची सेवा केली आहे. त्याने विश्चषक जिंकला आहे. कर्णधार म्हणून तो यशस्वी राहिला आहे. मला खरंच माहीत नाहीये की, क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी एकाद्याने अजून काय केले पाहिजे.”
इंग्लंडविरुद्ध शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन अश्विन, रविंद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने झाले आहेत. आता उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ आणि इंग्लंड संघ यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळेल. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारी रोजी राजकोट येथे सुरु होईल. त्यानंतर रांचीमध्ये 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत चौथा कसोटी सामना होईल. तर पाचवा आणि अंतिम कसोटी सामना धरमशाला येथील मैदानावर 07 मार्च रोजी सुरु होईल. (IND vs ENG. ‘No problem, me too…’, Dale Steyn tells his own story while supporting Virat Kohli )
महत्वाच्या बातम्या –
Team India । ‘या’ दोघांना संघात घेतल्याने चाहत्यांमध्ये नाराजी, शेवटच्या तीन कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार?
IND vs ENG : कोण आहे आकाश दीप? ज्याला कसोटीत पहिल्यांदाच मिळाली भारतीय संघात जागा