भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका २-१ च्या अंतराने जिंकली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी (१७ जुलै) खेळला गेला. भारताला मिळालेल्या विजयात सर्वात मोठा वाट रिषभ पंत आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांचा राहिला. या विजयानंतर भारतीय संघाच्या नावावर काही महत्वाच्या विक्रमांची नोंद झाली आहे.
भारतीय संघाने २०१५ पासून इंग्लंडच्या धरतीवर एकही एकदिवसीय मालिका जिंकली नव्हती. पण रविवारी मिळालेल्या विजयानंतर हा दुष्काळ संपला. मागच्या आठ वर्षात इंग्लंडने त्यांच्या मायदेशात एकूण १५ द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळल्या, ज्यामध्ये त्यांच्या विरोधात ७ वेगवेगळे संघ होते. यादरम्यानच्या काळात भारत असा दुसरा संघ ठरला आहे ज्यांनी इंग्लंडला त्यांच्या मादेशातील एकदिवसीय मालिकेत पराभूत केले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने २०१५ मध्ये ३-२ आणि २०२० मध्ये २-१ अशा अंतराने इंग्लंडला पराभूत केले होते.
२०१५ नंतर मायदेशातील एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला मिळालेले पराभव
१. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३-२ ने पराभव (२०१५)
२. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-१ ने पराभव (२०२०)
३. भारताविरुद्ध २-१ ने पराभव (२०२२)
भारतीय संघाने २०१५ एकदिवसीय विश्वचषकानंतर इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या (एकदिवसीय, टी-२०) एकूण ८ मालिका खेळल्या आहेत. या ८ मालिकांपैकी ७ मालिका भारताने जिंकल्या आहेत. इंग्लंडने फक्त एकदा २०१८ मध्ये खेळलेल्या एकदिवसीय मलिकेत भारताला पराभूत केले, जी इंग्लंडमध्ये खेळली गेली होती.
एकदिवसीय विश्वचषक २०१५ नंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या मर्यादित षटकांच्या मालिका
एकदिवसीय मालिका –
२०१७ – भारत २-१ ने विजयी (यजमान संघ भारत)
२०१८ – इंग्लंड २-१ ने विजयी (यजमान संघ इंग्लंड)
२०२१ – भारत २-१ ने विजयी (यजमान संघ भारत)
२०२२ – भारत २-१ ने विजयी (यजमान संघ इंग्लंड)
टी-२० मालिका –
२०१७ – भारत २-१ ने विजयी (यजमान संघ भारत)
२०१८ – भारत २-१ ने विजयी (यजमान संघ इंग्लंड)
२०२१ – भारत ३-२ ने विजयी (यजमान संघ भारत)
२०२२ – भारत २-१ ने विजयी (यजमान संघ इंग्लंड)
दरम्यान, भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध आजपर्यंत एकूण ११ एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत. इंग्लमधील भारताची ही चौथी मालिका आहे, ज्यामध्ये संघाने विजय मिळवला आहे. याठिकाणी भारताने शेवटची एकदिवसीय मालिका २०१४ साली ३-१ अशा अंतराने जिंकली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रिषभ पंत अन् इंग्लंडचा अंत! वनडेतील पहिलेच शतक झळकावत परदेशी भुमीवर केलीये ‘ही’ रेकॉर्डब्रेक कामगिरी
‘तो भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा खेळाडू’, वाचा रोहितने सामना जिंकल्यानंतर का गायले चहलचे गोडवे?
भारताशी दोन हात करण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ सज्ज, वाचा कोणाकोणाला मिळाली संधी?