---Advertisement---

IND vs ENG; इंग्लंडने जिंकला टाॅस, फलंदाजीचा निर्णय, टीम इंडियाच्या दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी

---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज (06 फेब्रुवारी) खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मालिकेतील पहिला नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होत आहे.

या सामन्यासाठी पाहुण्या इंग्लंड संघाने एक दिवस आधीच म्हणजे काल प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. ज्यात अनुभवी फलंदाज जो रुटचा समावेश करण्यात आला. भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाल्यास यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणा यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे. तर विराट कोहली दुखापतीमुळे हा खेळणार नाही. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी दोन्ही संघासाठी ही मालिका निर्णायक असणार आहे.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन –

इंग्लंड – बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद

भारत –  रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी

हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, भारत आणि इंग्लंडमध्ये आतापर्यंत 107 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यात भारताने 58 तर इंग्लंडने 44 सामने जिंकले आहेत. तीन सामने अर्निर्णीत तर दोन सामने बरोबरीत सुटले. भारतीय संघाने घरच्या मैदानावर आणि परदेशात इंग्लंडवर वर्चस्व गाजवले आहे. दोन्ही ठिकाणी संघाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. या एकदिवसीय मालिकेतही टीम इंडियाचा दबदबा असणार आहे.

हेही वाचा-

संघाला मोठा धक्का..! चॅम्पियन्स ट्राॅफीच्या तोंडावर अष्टपैलू खेळाडूने घेतली निवृत्ती
राहुल की रिषभ पंत, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण असेल विकेटकीपर? रोहित म्हणाला, ‘दोघांमध्येही सामना….
टीम इंडियाचे पुढचे विराट कोहली-रोहित शर्मा कोण असतील? माजी प्रशिक्षकाने या खेळाडूंना निवडले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---