भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विन हा भारतातील सर्वात घातक गोलंदाज मानला जातो. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत. या यादीत त्याने आणखी एका विक्रमाची भर घातली आहे. यावेळी त्याने भारतात अशी कामगिरी केली आहे, जी यापूर्वी कोणताही गोलंदाज करू शकला नव्हता. त्याने अनिल कुंबळेला एका मोठ्या विक्रमात मागे टाकले आहे.
याबरोबरच, आर अश्विनने रांची कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 2 विकेट्स घेत भारताच्या 351 कसोटी विकेट्स पूर्ण केले आहेत. यासह तो भारतातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. या खास यादीत त्याने अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. यासह तो 350 हून अधिक कसोटी विकेट्स घेणारा भारतातील पहिला गोलंदाज ठरला आहे.
घ्या जाणून भारतात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज
1. रविचंद्रन अश्विन – 352 कसोटी विकेट्स
2. अनिल कुंबळे – 350 कसोटी विकेट्स
3. हरभजन सिंग – 265 कसोटी विकेट्स
4. कपिल देव – 219 कसोटी विकेट्स
5. रवींद्र जडेजा – 210 कसोटी विकेट्स
Another day, another landmark! 🙌 🙌
With that Ben Duckett wicket, R Ashwin completed 3⃣5⃣0⃣ Test wickets in India 👍 👍
Follow the match ▶️ https://t.co/FUbQ3Mhpq9 #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/2hHY2Ohq7p
— BCCI (@BCCI) February 25, 2024
तसेच रविचंद्रन अश्विनने भारतीय भूमीवर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळेचा विक्रम मोडला आहे. आता भारतीय भूमीवर रविचंद्रन अश्विनच्या नावावर 115 कसोटी डावात 352 विकेट्स घेण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. तसेच या यादीत अनिल कुंबळेनंतर माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर हरभजन सिंगने भारतीय भूमीवर 265 कसोटी विकेट्स घेतले होते. कपिल देव यांनी भारतीय भूमीवर 219 कसोटी विकेट्स घेतले होते. रवींद्र जडेजाने भारतात 210 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 353 धावा केल्या. जो रुट 122 धावा करून नाबाद राहिला. त्याचवेळी भारताकडून रवींद्र जडेजाने 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 307 धावा करता आल्या. भारताकडून ध्रुव जुरेलने सर्वाधिक 90 धावा केल्या. दुसरीकडे, इंग्लंडकडून शोएब बशीरने 5 बळी घेतले. अशा स्थितीत इंग्लंडला पहिल्या डावात 46 धावांची आघाडी मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND Vs ENG : सुनील गावस्कर झाले ध्रुव जुरेलचे चाहते, म्हणाले, ‘ध्रुव जुरेल हा पुढचा महेंद्रसिंग धोनी…
- IND vs ENG : रांची कसोटीत ध्रुव जुरेलने करून दिली महेंद्रसिंग धोनीची आठवण, भारतीय संघासाठी ठरला संकटमोचन