भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना रांची येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो रूटच्या शतकाच्या जोरावर 353 धावा केल्या. भारतीय संघ पहिल्या डावात संघर्ष करताना दिसला आणि आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. रोहित शर्मा, शुबमन गिल, रजत पाटीदार, रवींद्र जडेजा आणि सर्फराज खान अशी मोठी नावे धावा करण्यात अपयशी ठरले आहेत.
याबरोबरच चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने चाहत्यांची मने जिंकली आहेत. ध्रुव जुरेलने रांची कसोटीतील आपल्या झुंजार फलंदाजीने माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघ मोठ्या संकटाचा सामना करत असताना ध्रुव जुरेल त्यांच्यासाठी संकटमोचक ठरला आहे. ध्रुव जुरेलने 149 चेंडूत 90 धावा केल्या असून या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले आहेत.
तसेच भारतीय संघाकडून ध्रुव जुरेलयाने 149 बॉलमध्ये 6 चौकार आणि 4 सिक्सच्या मदतीने 90 धावांची खेळी केली. यशस्वी जयस्वाल याने 117 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 8 फोर मारले आहेत. शुबमन गिल याने 65 बॉलमध्ये 38 आणि कुलदीप यादव याने 28 धावांची झुंजार खेळी केली. तर इतरांनी घोर निराशा केली. रजत पाटीदार 17, रवींद्र जडेदा 12 आणि सरफराज खान याने 14 धावा केल्या. तर कॅर्टन रोहित शर्मा 2 धावा करुन आऊट झाला होता.
तर इंग्लंडकडून 20 वर्षीय युवा शोएब बशीर याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. शोएबच्या कसोटी कारकीर्दीत 5 विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. शोएबने यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल या 5 जणांना आऊट केलं. टॉम हार्टले याने 3 विकेट्स घेतल्या. तर जेम्स एंडरसन याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
दरम्यान टीम इंडियाचा पहिला डाव आटोपल्यानंतर लंच ब्रेक झाला आहे. आता इंग्लंड दुसऱ्या डावाची सुरुवात 46 धावांच्या आघाडीने करणार आहे. आता इंग्लंड टीम इंडियासमोर दुसऱ्या डावात कशी बॅटिंग करते,याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला मोठा धक्का, ‘या’ स्टार क्रिकेटपट्टूवर होणार शस्त्रक्रिया
- IND vs ENG : ध्रुव जुरेलचे झुंझार अर्धशतक, इंग्लंडकडे पहिल्या डावात 46 धावांची आघाडी