राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ अपेक्षित सुरुवात करू शकला नाही. पण पहिल्या तीन विकेट्सनंतर भारतीय संघाला सूर गवसला. रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी वैयक्तिक शतके करत द्विशतकीय भागीदारी केली. परिणामी संघाने पहिल्या डावात 445 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेट यानेही शुक्रवारी वादळी शतक ठोकले.
बेन डकेट (Ben Duckett) राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. अवघ्या 88 चेंडूत त्याने कारकिर्दीतील तिसरे कसोटी शतक ठोकले. हे एखाद्या इंग्लिश फलंदाजाने भारताविरुद्ध केलेले सर्वात वेगवान कसोटी शतक ठरले. डकेटने या शतकासाठी 19 चौकार आणि एक षटकार मारला.
Ben Duckett becomes the fastest Englishman to score a Test century against India. pic.twitter.com/YVeOIeD0Mx
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 16, 2024
BEN DUCKETT SHOW IN RAJKOT…!!! 🔥
A century in just 88 balls with 19 fours and a six. What a counterattacking knock by Duckett, lethal striking throughout the innings. pic.twitter.com/PgqCPClcwp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 16, 2024
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.
(Ben Duckett becomes the fastest Englishman to score a Test century against India.)
महत्वाच्या बातम्या –
सूर्यकुमारमुळे नौशाद खान पाहू शकले सरफराजचे कसोटी पदार्पण, पाहा स्टार फलंदाजाशी काय आहे कनेक्शन?
NZ Vs SA : न्यूझीलंडनं संपवला 92 वर्षांचा दुष्काळ! केन विल्यमसनने गेल्या 7 सामन्यात झळकावली सात शतके