---Advertisement---

गोलंदाजांमुळे भारत पराभूत झाला? वाचा पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला

On: गुरूवार, नोव्हेंबर 10, 2022 7:13 PM
Bhuvneshwar-Kumar
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताने 10 विकेट्सच्या मोठ्या अंतराने पराभव स्वीकारला. भारतीय संघाच्या पराभवाचे कारण, गोलंदाजांचे सुमार प्रदर्शन ठरले. कर्णधार रोहित शर्मा देखील पराभवाचे खापर गोलंदाजांवर फोडताना दिसला. रोहितच्या नेतृत्वात संघाने अप्रतिम प्रदर्शन करत उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला, पण उपांत्य सामन्यात संघातील खेळाडूंनी चांगलीच निराशा केली. भारतीय गोलंदाजांना इंग्लंडची एकही विकेट मिळाली नाही. 

टी-20 विश्वचषक 2022 मधील पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान संघाने न्यूझीलंडला पराभूत करत अंतिम सामन्यात जागा पक्की केली. गुरुवारी (10 नोव्हेंबर) भारताला पराभूत करून इंग्लंड अंतिम सामन्यात पोहोचणारा दुसरा संघ ठरला आहे. विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेलेला दुसरा उपांत्य सामन्यात एडिलेड ओव्हलवर खेळला गेला, जो इंग्लंडने एकाही विकेट न गमावता जिंकला. सामना संपल्यानंतर माधम्यांशी बोलताना रोहितने संघातील गोलंदाजांवर पराभवाचे खापर फोडताना दिसला.

रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “आज आपण ज्या पद्धतीने खेळलो, त्यामुळे खूप निराश आहे. आम्ही ती धावसंख्या करण्यासाठी चांगली फलंदाजी केली. पण गोलंदाजीत मात्र चांगली करू शकलो नाही. आज आम्ही या सामन्यात पुनरागमन करू शकलो नाही. हे सर्व नॉक-आऊट सामन्याचा दबाव सांभाळण्याविषयी आहे. या सर्वांनी ही गोष्ट समजून घेण्यासाठी खूप क्रिकेट खेळले आहे. त्यांनी आयपीएल सामन्यांच्या दबावात प्रदर्शन केले आहे. हे सर्वकाही तुम्ही दबाव कसा सांभाळता यावर अवलंबून आहे.” रोहितच्या मते या सामन्यात काही खेळाडूंनी दबाव झेलला, तर काहींना ते जमले नाही.

“आम्ही सुरुवातीला घाबरलेलो होतो. पण आपण सलामीला आलेल्या फलंदाजांनी श्रेय दिले पाहिजे. ते चांगले खेळले. माझ्या मते याठिकाणी पहिल्या षटकात चेंडू थोडा स्विंग झाला, पण गोलंदाजी योग्य क्षेत्रात झाली नाही. आम्ही याठिकाणी खेळलेला पहिला सामना जिंकला होता (बांगलादेशविरुद्ध) आणि परिस्थिती खूप वेगळी होती. बांगलादेशविरुद्धचा सामना खूप कठीण होता. त्या सामन्यात आपण योजनेनुसार काम करत असल्याचे जाणवले होते, पण आज असे झाले नाही.”

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. 20 षटकांमध्ये भारतीय संघ विराट कोहली (50) आणि हार्दिक पंड्या (63) यांच्या अर्धशतकीय योगदानामुळे 168 धावांपर्यंत पोहोचला. यासाठी भारताच्या सहा फलंदाजांना विकेट्स गमवावी लागली. प्रत्युत्तरा न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला जोस बटलर आणि ऍलेक्स हेल्स शेवटपर्यंत नाबाद राहिला. बटलरने 80, हेल्सने 86 धावांची नाबाद केळी करत संघाला विजय मिळवून दिला. अवघ्या 16 षटकांमध्ये आणि एकही विकेट न गमावता न्यूझीलंड संघ विजयी झाला. (IND vs ENG Rohit Sharma blamed the defeat against england on the  bowlers)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकप जिंकला नसला, तरी ‘किंग’ कोहलीमुळे कोट्यवधी भारतीय विसरणार नाहीत हा विश्वचषक; कसं ते वाचा
मोठी बातमी! भारतात क्रिकेटचा पाया रचणारा दिग्गज हरपला, चाहते दु:खात  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---