भारतीय संघ गुरुवारी (10 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषक 2022 मधून बाहेर पडला. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या उपांत्य सामन्यात भारताला तब्बल 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर 130 कोटी भारतीय चाहत्यांची निराशा झाली. सोबतच संघातील खेळाडू देखील चांगले नाराज असल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार रोहित शर्मा याला पराभवामुळे डोळ्यांतील पाणी अनावर झाल्याचेही दिसले. रोहित डगआऊटमध्ये बसून रडतानाचा व्हिडिओ सथ्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. मर्यादित 20 षटकांमध्ये भारताने 6 विकेट्सच्या नुकसानावर 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडसाठी सलामीला आलेला कर्णधार जोस बटलर आणि ऍलेक्स हेल्स यांनी जबरदस्त प्रदर्शन केले. या दोघांनी संघाला विजय मिळवून देत शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिले. इंग्लंडने 16 व्या षटकात हा सामना जिंकला. सुरुवातील भारतीय संघाचे पारडे सामन्यात जड वाटत होते, पण गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही. रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पराभवाचे खाबर देखील गोलंदाजांवर फोटले. सामना संपल्यानंतर जेव्हा रोहित डग-आऊटमध्ये गेला, तेव्हा त्याला अश्रृ अनावर झाले. रोहित रडतानाचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
@ImRo45 saw you crying. No issues its cricket. Played good game.
Just one thought. Play like a captain. Dont fall prey.
K L Rahul is perishing and he needs rest. May be permanent. One major setback was not to pick Chahal.Ashwin needs a kick on his back immediately. Kick as fast pic.twitter.com/W7IaED5SMG— Sanjay Tripathi (@sanz15071972) November 10, 2022
Captaincy chod do bhai @ImRo45 ! #INDvENG #T20Iworldcup2022 pic.twitter.com/bxQE1Nopwy
— Gautam Mishra (@itsGautamMishra) November 10, 2022
रोहितचे या सामन्यातील वैयक्तिक प्रदर्शन देखील अपेक्षेप्रमाणे झाले नाही. त्याने या उपांत्य सामन्यात 28 चेंडू खेळले आणि 27 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 4 चौकार मारले. त्याच्या साधीने डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला केएल राहुल देखील अवघ्या 5 धावा करून तंबूत परतला. विराट कोहलीने 40 चेंडूत 50 धावा केल्या, तर हार्दिक पंड्या याने 33 चेंडूत सर्वाधिक 63 धावा कुटल्या. मध्यक्रमताली सूर्यकुमार यादवकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, सूर्याने एक चुकीचा शॉट खेळण्याचा प्रयत्नात विकेट गमावली.
Rohit Sharma crying on his captaincy #INDvsENG pic.twitter.com/aLI9eddkHR
— Sudhanshu Ranjan Singh (@memegineers_) November 10, 2022
इंग्लंडसाठी त्यांचा कर्णधार जोस बटलर या विश्वचषकात अपेक्षित प्रदर्शन करताना दिसला नव्हता. पण त्याने ऐन उपांत्य सामन्यात नाबाद 80 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या साधीने सलामीला आलेला ऍलेक्स हेल्स देखील 86 धावा करून नाबाद राहिला. आता विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (13 नोव्हेंबर) पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. (IND vs ENG Rohit Sharma broke down in tears after the defeat)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भारतात क्रिकेटचा पाया रचणारा दिग्गज हरपला, चाहते दु:खात
युवराज सिंगच्या मोठ्या विक्रमाला धक्का! खास यादीत हार्दिक पंड्या पोहोचला पहिल्या क्रमांकावर