---Advertisement---

युवराज सिंगच्या मोठ्या विक्रमाला धक्का! खास यादीत हार्दिक पंड्या पोहोचला पहिल्या क्रमांकावर

---Advertisement---

भारतीय संघासाठी टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य सामन्यात हार्दिक पंड्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. हार्दिकने इंग्लंडविरुद्धच्या उंपात्य सामन्याच्या लढतीत 33 चेंडूत 63 धावा केल्या. भारतासाठी हार्दिकसोबत विराट कोहली देखील अर्धशतकीय योगदान देऊ शकला. मर्यादित 20 षटकांमध्ये भारताने 6 विकेट्सच्या नुकसानावर 168 धावा केल्या. दरम्यान, हार्दिकने या सामन्यातील जबरदस्त खेळीच्या जोरावर माजी दिग्गज युवराज सिंग याचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

भारतासाठी टी-20 विश्वचषकात पाच किंवा त्यानंतरच्या क्रमांकावर खेळाताना सर्वोत्तम खेळी करणाऱ्यांच्या यादीत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत यापूर्वी युवराज सिंग (Yuvraj Singh) पहिल्या क्रमांकावर होता. पण गुरुवारी (10 नोव्हेंबर) हार्दिकने युवराजला पछाडत यादीत अव्वल क्रमांक गाठला. युवराजने टी-20 विश्वचषक 2007 मध्ये इंग्लंडविरुद्ध 58 धावा केल्या होत्या. या धावा त्याने संघासाठी फिनिशरच्या रूपात केल्या होत्या. यादीत तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. रोहितने देखील टी-20 विश्वचषक 2007 मध्ये फिनिशरच्या रूपात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 50 धावा केल्या होत्या.

यादीत चौथ्या क्रमांकावर एमएस धोनी () तर पाचव्या क्रमांकावर सुरेश रैना आहे. धोनीने 2007 च्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 45 धावांची खेळी केली होती. रैनाच्या खेळीचा विचार केला, तर त्याने 2012 टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 45 धावा केल्या होत्या.

भारतासाठी टी-20 विश्वचषकात पाच किंवा त्यानंतरच्या क्रमांकावर सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज
63 – हार्दिक पंड्या विरुद्ध इंग्लंड (2022)
58 – युवराज सिंग विरुद्ध इंग्लंड (2007)
50* – रोहित शर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2007)
45 – एमएस धोनी विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2007)
45 – सुरेश रैना विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2012)

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्याचा विचार केला, तर भारतासाठी हार्दिक आणि विराट या दोघांनी महत्वपूर्ण अर्धशतके केली. त्याव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा 27, तर सूर्यकुमार यादव 14 धावा करून बाद झाला. सलामीला आलेला केएल राहुल अवघ्या 5 धावा करून तंबूत परतला. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. मर्यादित 20 षटकांमध्ये संघाने 6 विकेट्सच्या नुकसानावर 168 धावा केल्या.  (ind vs eng Highest score by Indian on No 5 or lower in Men’s T20 World Cup)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारावरही भारी पडला एकटा विराट, विश्वचषकात केलाय जबरदस्त रेकॉर्ड
विराट-हार्दिकच्या झंझावाताने टीम इंडियाचे कमबॅक! फायनलसाठी इंग्लंडसमोर 169 धावांचे आव्हान 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---