---Advertisement---

लॉर्ड्स मैदानावर रोहितचा ७६ मीटरचा लांबलचक सिक्स अन् चाहत्यांचा आनंद गगनात; केला भरपूर जल्लोष

On: शुक्रवार, ऑगस्ट 13, 2021 7:05 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका (IND vs ENG) सुरू आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि प्रथम फलंदाजीला आलेल्या केएल राहुल यांनी अप्रतिम कामगिरी करत संघाला चांगली सुरुवात दिली. दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या बॅटने जोरदार गर्जना केली.

रोहित शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली आणि मैदानाच्या चहूबाजूंनी शॉट्स मारले. त्याचवेळी सामन्याच्या 26 व्या षटकात हिटमॅनने मार्क वुडच्या चेंडूवर पुलशॉट खेळून षटकार ठोकला.

रोहित शर्माचा हा शॉट पाहून मैदानावरील काही भारतीय चाहत्यांनी हातात दारूने भरलेले ग्लास घेऊन उत्साह साजरा केला. रोहित शर्माचा हा षटकार 76 मीटर लांब होता. त्याला त्याच्या पुल शॉटमध्ये खूप आत्मविश्वास होता. म्हणूनच त्याने हा शॉट खेळताच चेंडूकडे पाहिलेही नाही.

https://twitter.com/AbdullahNeaz/status/1425813943247728642?s=20

भारतीय संघाच्या वतीने रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोन्ही सलामीवीरांनी भारतीय संघाला शानदार सुरुवात दिली आहे. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. मात्र जेम्स अंडरसनने 83 धावांवर त्याला पव्हेलियनला पाठवले, त्यामुळे त्याचे शतक हुकले.

जर रोहितने शतक केले असते, तर परदेशी भूमीवर कसोटीत त्याने शतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली असती. याआधी त्याच्या नावावर कसोटीत 7 शतके आहेत, जी भारतातच झाली आहेत. रोहितच्या या खेळीने त्याला टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले, ज्यांनी त्याला कसोटीपटू मानले नाही. सोशल मीडियावरील चाहते या खेळीनंतर हिटमॅनचे कौतुक करून थकत नाहीयत.

महत्त्वाच्या बातम्या-

चौकारानंतर चौकार खेचत रोहितने सॅम करनची केली ‘दुर्दशा’, व्हिडिओ जोरदार व्हायरल

पुजाराची विकेट अँडरसनसाठी ठरली विक्रमी, भारताविरुद्ध ‘ही’ किमया साधणारा ठरला पहिलाच गोलंदाज

‘क्रिकेटर, कर्णधार अन् आता बीसीसीआय अध्यक्ष बनून आलोय’; आजही लॉर्ड्सवर दादाची दादागिरी!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---