आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये सुरू आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच भारतीय संघाची सुरुवात खुपच खराब झाली होती. तर भारतीय संघाने 9व्या षटकात अवघ्या 33 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता.
त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने शामदार अर्धशतक ठोकले आणि राजकोटमध्ये भारताचा डाव सावरला असून तो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. याबरोबरच दिवसाच्या पहिल्या सत्रात रोहित दुखापतीतून थोडक्यात वाचला आहे. कारण मार्क वुडच्या बाऊन्सरमुळे तो जखमी झाला असता. मात्र त्याला हेल्मेटने वाचवले आहे.
अशातच, भारतीय डावात मार्क वुड इंग्लंडसाठी 10 वे षटक टाकत होता. तेव्हा षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने बाउन्सर टाकला होता. तेव्हा चेंडू खेळपट्टीवर पडला आणि नंतर थेट रोहितच्या हेल्मेटच्या ग्रिलवर गेला होता. तसेच चेंडू हेल्मेटला लागल्याने रोहित काही काळ थांबला. हे पाहून टीम इंडियाचे फिजिओ लगेच मैदानात पोहोचले होते. मात्र, रोहितला गंभीर दुखापत झालेली नाही.
याबरोबरच, राजकोट कसोटीत रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे इंग्लंडविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये 2000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो नववा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने बरेच दिवस कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतकही केले नव्हते.
This is some of the rare moments of cricket. Rohit Sharma leaving bouncers and not playing his favourite pull shot. This shows how much pressure and burden he's going through by having such young inexperienced players who are not performing upto the mark currently.
Best of the… pic.twitter.com/h1G8W7pcir— 𝗛𝗔𝗥𝗗𝗬 (@hardy0_9) February 15, 2024
दरम्यान, रोहितनेही एक बाजू लावून धरत 8 डावांनंतर अर्धशतक ठोकलं. रोहितने 71 बॉलमध्ये 8 चौकारांच्या मदतीने 71.83 च्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. रोहितचं कसोटी कारकीर्दीतील हे 17 वं आणि इंग्लंड विरुद्धचं चौथं अर्धशतक ठरलं आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या –
- IND Vs ENG : सुरूवातीच्या धक्क्यानंतर रोहित शर्माला गवसला सूर, झाला सचिन-कोहलीच्या क्लबमध्ये दाखल
- IND vs ENG : सरफराज खानला कॅप देताना अनिल कुंबळेचे वक्तव्य व्हायरल; म्हणाले,’सरफू…