मुंबईकर सरफराज खानने आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणात जोरदार सुरुवात केली आहे. सरफराज खान याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून पदार्पण केलं. सरफराजने आपल्या पहिल्याच खेळीत खणखणीत अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच सरफराजने या अर्धशतकी खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार लगावलं. सरफराजने 104.17 च्या वनडे स्ट्राईक रेटनुसार हे अर्धशतक पूर्ण केलं. सरफराजने अर्धशतकादरम्यान मैदानात चौफेर फटकेबाजी देखील केली आहे.
याबरोबरच, सरफराज खान पदार्पणाच्या सामन्यात रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी धावबाद झाला. तर राजकोटमधील पदार्पणाच्या सामन्यात धावबाद झाल्यानंतरही, सरफराज खानने भारताचे माजी दिग्गज आणि त्याला पदार्पण कॅप देणाऱ्या अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली.
सध्या अनिल कुंबळे आणि सर्फराज खान यांच्यात रनआऊटच्या माध्यमातून एक खास कनेक्शन तयार झाले आहे. याआधी, अनिल कुंबळेनेही इंग्लंडविरुद्ध 9 ऑगस्ट 1990 रोजी मँचेस्टरमध्ये कसोटी पदार्पण केले होते. सरफराजप्रमाणेच कुंबळेही पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात रनआऊट झाला होता. मात्र, कुंबळेला पहिल्या कसोटी डावात केवळ 2 धावा करता आल्या होत्या. तसेच सरफराजने पहिल्या डावापेक्षा 62 धावा केल्या आहेत.
तसेच, राजकोट कसोटीत सरफराज खानला भारताचा माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने पदार्पणाची कसोटी कॅप दिली होती. अशा परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध पदार्पणाची कसोटी कॅप घेऊन कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी करणे हा एक योगायोग जुळून आला आहे.
दरम्यान सरफराज टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 311 वा भारतीय ठरला. सरफराजला सामन्याआधी टीम इंडियाचे दिग्गज अनिल कुंबळे यांनी कॅप दिली. तसेच सरफराजसह ध्रुव जुरेल यानेही डेब्यू केलं. प्रत्येक खेळाडूचं आपल्या पदार्पणात धमाकेदार कामगिरी करण्याची इच्छा असते. आपल्याला कायम ती खेळी लक्षात रहावी, असं प्रत्येक खेळाडूला वाटतं. मात्र त्यात प्रत्येक खेळाडू यशस्वी होतोच असं नाही. मात्र सरफराज खान याने आपण काय पट्टीचे फलंदाज आहोत, हे आपल्या अर्धशतकी खेळीने दाखवून दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG । सरफराजच्या वडिलांकडून रोहितचा सर म्हणून उल्लेख, कर्णधाराचे मन जिंकणारे उत्तर
- प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेत अमर क्रीडा, शिवनेरी सेवा, अंकुर स्पोर्टस्, लायन्स स्पोर्टस् उपांत्यपूर्व फेरी दाखल.