आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी राजकोटच्या निरंजन शहा स्टेडियमवर सुरू झाली आहे. तसेच आज भारतीय संघाकडून दोन खेळाडूंनी कसोटी पदार्पण देखील केलं आहे. यामध्ये मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खान आणि उत्तर प्रदेशचा विकेटकिपर ध्रुव जुरेल यांना आज पदार्पणाची कॅप देण्यात आली आहे.
याबरोबरच, सर्फराज खानने गेल्या काही वर्षापासून रणजी ट्रॉफीत धावांचा पाऊस पाडला आहे. तसेच प्रत्येक हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करून देखील सर्फराजसाठी टीम इंडियाचे दार उघडत नव्हते.पण प्रत्येक संघनिवडीवेळी त्याची चर्चा व्हायची मात्र त्याला वारंवार डावलले जात होते. तसेच सरफराजच्या पदार्पणानंतर त्याचे वडील नौशाद यांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली आणि भावूक झाले, त्यावर बरीच चर्चा झाली असून त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
आज राजकोटवर अनिल कुंबळेच्या हस्ते त्याला पदार्पणाची कॅप देण्यात आली. यावेळी सर्फराज खानचे आई आणि वडील देखील उपस्थित होते, आणि भावूक झाले होते. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने सर्फराजच्या वडिलांना जाऊन मिठी मारली होती. त्यानंतर त्याचे वडीलही कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले पहायला मिळाले होते. अशातच कॉमेंट्री बॉक्समध्ये आल्यानंतर सर्फराजच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
घ्या जाणून काय बोलले सरफराज खानचे वडिल नौशाद खान?
कॉमेंट्री बॉक्समध्ये आकाश चोप्राने सरफराजच्या वडिलांना प्रश्न विचारला होता की, सरफराज खानचा डेब्यू पाहण्यासाठी तुम्ही खूप वेळ वाट पाहिली होती का? याला उत्तर देताना सरफराजचे वडील नौशाद खान म्हणाले आहेत की, ‘रात्र निघायला वेळ लागतो, पण माझ्या इच्छेनुसार सूर्य उगवणार नाही.’ म्हणजेच आयुष्यातील गडद टप्पा अर्थात वाईट काळ निघून जायला वेळ लागतो हे त्यांचे विधान स्पष्ट होते. त्यावर मात करण्यासाठी यशाचा सूर्य त्यांच्या इच्छेनुसार उगवू शकत नाही.
Aakash Chopra – did you wait for too long to see Sarfaraz Khan making his debut?
Naushad Khan – Raat ko waqt chahiye guzarne ke liye, lekin Suraj meri marzi se nahi nikalne wala (it takes time for the night to pass, the sun is not going to rise according to my wish). pic.twitter.com/LqN60mUkfI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 15, 2024
दरम्यान, सर्फराज खान भारताचा 311 वा कसोटीपटू ठरला असून त्याला अनुभवी अनिल कुंबळेच्या हस्ते कॅप देण्यात आली आहे. याशिवाय ध्रुव जुरेललाही कसोटी कॅप मिळाली असून तो भारताचा 312 वा कसोटीपटू ठरला आहे.
From The Huddle! 🔊
A Test cap is special! 🫡
Words of wisdom from Anil Kumble & Dinesh Karthik that Sarfaraz Khan & Dhruv Jurel will remember for a long time 🗣️ 🗣️
You Can Not Miss This!
Follow the match ▶️ https://t.co/FM0hVG5X8M#TeamIndia | #INDvENG | @dhruvjurel21 |… pic.twitter.com/mVptzhW1v7
— BCCI (@BCCI) February 15, 2024
महत्वाच्या बातम्या –