---Advertisement---

कोहलीचा 8 वर्षापूर्वीचा गोलंदाजी रेकाॅर्ड अक्षर पटेलनं काढला मोडीत

On: शुक्रवार, जून 28, 2024 12:40 AM
Axar Patel
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup) सेमीफायनलमध्ये भारतीय संघ इंग्लंडशी भिडत आहे. आज (27 जून) रोजी गयाना स्टेडियमवर सामना रंगला आहे. भारत 2024 पूर्वी 4 वेळा टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचलं होतं, त्यापैकी फक्त 2 वेळा विजय मिळाला होता. परंतू आतापर्यंत कोहली हा टी20 विश्वचषकाच्या बाद फेरी सामन्यात विकेट घेणारा शेवटचा खेळाडू होता. गेल्या 8 वर्षांपासून कोहली भारतासाठी बाद फेरीत विकेट घेणारा शेवटचा गोलंदाज होता. परंतू आता अक्षर पटेलनं हा रेकाॅर्ड मोडला.

2016 च्या टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना 192 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनं हे आव्हान 7 विकेट्स शिल्लक असताना पूर्ण केलं आणि फायनलमध्ये धडक मारली होती. या सामन्यात वेस्ट इंडिजची तिसरी आणि शेवटची विकेट जॉन्सन चार्ल्सची होती. चार्ल्सनं त्या सामन्यात 36 चेंडूत 52 धावा केल्या आणि विराट कोहलीच्या गोलंदाजीवर रोहित शर्मानं त्याचा झेल घेतला. त्यानंतर टी20 विश्वचषकातील एकाही बाद फेरीत भारतीय गोलंदाजाला एकही विकेट घेता नव्हती.

त्यानंतर 2021च्या टी20 विश्वचषकात भारताला बाद फेरी गाठता आली नाही. 2022च्या विश्वचषकात भारत बाद फेरीत पोहचला. जिथं त्यांचा सामना इंग्लंडशी झाला. पण इंग्लंडनं एकही विकेट न गमावता भारताचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यांमुळे कोहलीचं गोलंदाजी रेकाॅर्ड कायम होते. परंतू या टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलननं इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला बाद करत कोहलीचा 8 वर्षापूर्वीचा रेकाॅर्ड मोडला.

महत्त्वाच्या बातम्या-

कर्णधार रोहित शर्माचं झंझावाती अर्धशतक! भारताचं इंग्लंडसमोर 172 धावांचं आव्हान
यंदाच्या टी20 विश्वचषकात कोहलीचा आयपीएल फाॅर्म ठरला झीरो!
सेमीफायनल सामन्यात भारतानं हारला टाॅस; जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---