England vs India Test Series: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने इंग्लंडविरुद्ध होणारी कसोटी मालिका खेळण्याबाबत मोठं विधान केलं आहे. शमी म्हणाला की, कसोटी मालिका खेळण्यासाठी तो पुर्ण मेहनत घेत आहे. शमी सध्या दुखापतग्रस्त आहे. तो 25 जानेवारी पासुन सुरु होणाऱ्या इंग्लडविरूद्धच्या पहिल्या दोन सामन्यात खेळू शकणार नाही.
मागील वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वकप स्पर्धेत मोहम्मद शमी याने आपल्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीने भारतीय क्रिकेट संघाला अनेक विजय मिळवून दिले होते. यादरम्यान दुखापतीत असतानाही त्याने इंजेक्शन घेऊन पूर्ण विश्वचषक खेळला. अशा परिस्थितीत शमीने अफलातून गोलंदाजी करत 23 विकेट्स घेतल्या. मात्र एकदिवसीय विश्वचषकानंतर शमी एकही सामना खेळलेला नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याची कमतरता संघाला नक्कीच भासली.
माध्यमांशी बोलताना शमी म्हणाला की, “इंग्लडविरुद्धची कसोटी मालिका खेळू शकेल यासाठी मी माझ्याकडून पुर्ण प्रयत्न करत आहे. तसं पाहता कसोटी क्रिकेटमध्ये खूप वेळ मैदानावर द्यावा लागतो त्यामुळे अशावेळी मनात कोणतीही शंका असायला नको.”
या अगोदर माध्यमांमध्ये बातमी आली होती की, शमी फीट नसल्यामुळे इंग्लडविरुद्ध होणाऱ्या पहील्या दोन कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. इंग्लंड कसोटी अगोदर शमीला एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे.
विश्वचषक 2023 मध्ये केलेल्या कामगिरीमुळे क्रिकेटमधील सर्वोच्च मानला जाणारा अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याचाही समावेश आहे. (IND vs ENG Shami’s big statement on playing Test series against England, says I will do my best)
हेही वाचा
AUS vs PAK: हसन अलीच्या क्षेत्ररक्षणाची चाहत्यानी उडवली खिल्ली, चिडलेल्या क्रिकेटपटूने दिले चोख उत्तर
T20 World Cup: जर रोहित उपलब्ध असेल तर तुम्ही त्याला वगळू शकत नाही, टी20 विश्वचषकावर माजी दिग्गजाचं विधान