---Advertisement---

IND vs ENG । स्मिथ, पाँटिंग आणि विव्ह रिचर्ड्सवर जो रुट भारी! कसोटी क्रिकेटमध्ये घडवला नवा इतिहास

On: शुक्रवार, फेब्रुवारी 23, 2024 5:46 PM
Joe-Root
---Advertisement---

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज जो रुट चमकला. शुक्रवारी (23 फेब्रुवारी) हा सामना रांचीमध्ये शुरू झाला. पहिल्या दिवसाखेर इंग्लंडची धावसंख्या 7 बाद 302 धावा आहे. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण सुरुवातीच्या पाच विकेट्स स्वस्तात गमावल्या. अडचणीच्या काळात रुटचे शतक झाल्यामुळे संघ सुस्थितीत पोहोचला. शुक्रवारी या शतकी खेळीच्या जोरावर रुटच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले.

इंग्लंडची धावसंख्या शुक्रवारी पहिल्या सत्रात 112 होती, तेव्हा पाहुण्या संघाने डावातील आपली पाचवी विकेट गमावली. पण त्यानंतर सहाव्या विकेटसाठी जो रुट (Joe Root) आणि बेन फोक्स यांनी 113 धावांची भागीदारी केली. परिणाम दिवसाखेर संघाची धावसंख्या देखील 300 पार पोहोचली. रुटने रांची कसोटीच्या पहिल्याच दिवशी कसोटी कारकिर्दीतील 31 वे शतक केले. विशेष म्हणजे यातील 10 शतके त्याने एकट्या भारताविरुद्ध केली आहेत. रुट जगातील एकमेव फलंदाज आहे, ज्याने कसोटी फॉरमॅटमध्ये भारताविरुद्ध 10 शतकांचा टप्पा गाढला आहे.

भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करणारे फलंदाज
जो रुट – 10 (52 डाव)
स्टीव स्मिथ – 9 (37)
रिकी पाँटिंग – 8 (51)
विव्ह रिचर्ड्स – 8 (41)

रांची कसोटीत शतक होण्याआधी रुटच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला होता. रुट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19000 धावा पूर्ण करणारा 14 वा क्रिकेटपटू बनला आहे. शुक्रवारचा खेळ संपल्यानंतर त्याने केलेल्या आंतरराष्ट्रीय धावांची संख्या 19014 इतकी आहे. सर्वात कमी डावांमध्ये 190000 धावा करणाऱ्यांच्या यादीत रुट चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 444 डावांमध्ये रुट 19000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करू शकला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 19000 धावा करणारे
विराट कोहली – 399 डाव
सचिन तेंडुलकर – 432
ब्रायन लारा – 433
जो रुट – 444

रांची कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन

भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप (पदार्पण), कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
(IND vs ENG. Smith, Ponting and Viv Richards are the only Joe Root! New history made in test cricket)

महत्वाच्या बातम्या – 
IND Vs ENG : रविचंद्रन अश्विनने रांची कसोटीत पहिल्यांदाच संभाळले कर्णधारपद, अन् रोहित शर्मा…
Ranchi Test । रुटमुळे इंग्लंडला नवसंजीवनी! दिवसाखेर पाहुण्यांची धावसंख्या 300+, आकशच्या नावावर सर्वाधिक विकेट्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---