भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना रांची येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो रूटच्या शतकाच्या जोरावर 353 धावा केल्या. भारतीय संघ पहिल्या डावात संघर्ष करताना दिसला आणि आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. त्यानंतर रांची कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 307 धावांवर आटोपला आहे.
याबरोबरच पहिल्या डावात टीम इंडियाची धावसंख्या 300 च्या पुढे नेण्यात ध्रुव जुरेलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ध्रुव जुरेलने शेवटपर्यंत इंग्लंड गोलंदाजांचा योद्ध्याप्रमाणे सामना केला. त्यानंतर आता टीम इंडियाचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर देखील ध्रुव जुरेलचे चाहते झाले असून सुनील गावस्कर यांनी ध्रुव जुरेलची तुलना टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी केली आहे.
तसेच रांची कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात ध्रुव जुरेलने टीम इंडियाकडून सर्वाधिक 90 धावांची खेळी खेळली आहे. तसेच तो त्याच्या पहिल्या कसोटी आंतरराष्ट्रीय शतकापासून तो 10 धावा दूर राहिला असला तरी आता सर्वजण ध्रुवच्या खेळीचे कौतुक करत आहेत. टीम इंडियाचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी कॉमेंट्री दरम्यान ध्रुव जुरेलचे कौतुक केले आणि सांगितले की ध्रुव जुरेलची मानसिक क्षमता पाहता, मला वाटते की तो पुढील एमएस धोनी आहे.
https://twitter.com/BCCI/status/1761620368576434663
दरम्यान, भारतीय फलंदाजांना इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर टिकाव धरता आला नाही. एकेकाळी टीम इंडियाला 250 धावाही करता येणार नाहीत असे वाटत होते पण ध्रुव जुरेलचे इरादे वेगळेच होते. त्याने केवळ डाव सांभाळला नाही तर संघाची धावसंख्या 300 च्या पुढे नेली. पहिल्या डावात ध्रुव जुरेलने त्याच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. मात्र, ध्रुव त्याच्या शतकाच्या अगदी जवळ आऊट झाला. त्यामुळे ध्रुवचे चाहतेही निराश झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –





