---Advertisement---

IND vs ENG; पुण्यात भारतानं इंग्लंडला लोळवलं, पांड्या-दुबेची झंझावती खेळी, मालिका खिश्यात..!

On: शनिवार, फेब्रुवारी 1, 2025 7:40 AM
---Advertisement---

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना 15 धावांनी जिंकला आहे. या विजयासह भारताने 3-1 ने मालिका जिंकली. मालिकेतील शेवटचा सामना आणखी बाकी आहे. या सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर, टीम इंडिया प्रथम फलंदाजीला आली. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्या 53-53 धावांच्या खेळीच्या मदतीने संघाला मर्यादित 20 षटकांत 9 गडी गमावून 181 धावांपर्यंत पोहोचण्यात यश आले. लक्ष्याचा पाठलाग करताना, एकेकाळी इंग्लंड सामन्यात वर्चस्व गाजवत दिसत होता, परंतु भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे इंग्लंडचा संघ 19.4 षटकांत 166 धावांवर गारद झाला. भारतीय संघाकडून रवी बिश्नोई आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाची शानदार सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी सलामी जोडीने 62 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी टीम इंडियाचा युवा लेग स्पिनर रवी बिश्नोईने मोडली. त्यानंतर भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. जोस बटलर फक्त २ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर लियाम लिव्हिंगस्टोन 9 धावा करून झटपट बाद झाले. हॅरी ब्रूकने एक टोक सांभाळून 26 चेंडूत 51 धावांची खेळी करत इंग्लंडला सामन्यात निश्चितच टिकवून ठेवले, परंतु या मालिकेत तो पुन्हा एकदा वरुण चक्रवर्तीचा बळी ठरला. तो बाद झाल्याने इंग्लंडला गळती लागली. सातत्याने विकेट्स गेल्याने संघ केवळ 166 धावांपर्यंत पोहचू शकला. भारताकडून गोलंदाजीत रवी बिश्नोईने चार षटकांत फक्त 28 धावा देत तीन विकेट्स घेतल्या, तर हर्षित राणाने 4 षटकांत 33 धावा देत तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. याशिवाय वरुण चक्रवर्तीने 2 तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये टीम इंडियाला लक्ष्याचा पाठलाग करावा लागला असला तरी, या सामन्यात त्यांना प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. भारतीय संघाने पहिल्या 6 षटकांत तीन महत्त्वाच्या विकेट गमावल्या. यानंतर, 79 धावांपर्यंत, अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर, हार्दिक पांड्या आणि बऱ्याच काळानंतर प्लेइंग 11 मध्ये परतलेला शिवम दुबे यांनी डाव सांभाळला. दोघांमधील 87 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताला 181 धावांपर्यंत मजल मारता आली. हार्दिक आणि शिवम दोघांनीही 53-53 धावा केल्या. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना साकिब महमूदने तीन, जेमी ओव्हरटनने दोन तर ब्रायडन कार्स आणि आदिल रशीदने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा-

संघाला मोठा धक्का! अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडूची अचानक निवृत्ती
विराटला क्लीन बोल्ड करणारा हिमांशू सागवान आहे तरी कोण? पाहा आकडेवारी
चाहत्यांच्या अपेक्षांवर पुन्हा पाणी, विराट कोहलीकडून डोमेस्टिक क्रिकेटमध्येही धावा निघेना…!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---