कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा ४ विकेट्सने पराभव केला. यासह, टीम इंडियाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो रोहित शर्मा होता, ज्याने ९० चेंडूत ११९ धावांची शानदार आणि संस्मरणीय खेळी केली. त्याच्याशिवाय शुभमन गिलनेही अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोठे योगदान दिले.
कटकमधील बाराबती मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करत 304 धावांचा मोठा स्कोर केला. इंग्लंडकडून जो रूट आणि बेन डकेट यांनी अर्धशतके झळकावली, तर शेवटच्या षटकांमध्ये लियाम लिव्हिंगस्टोननेही 41 धावांची जलद खेळी केली. आपल्या संघाची धावसंख्या 300 धावांच्या पुढे नेण्यात मोठी भूमिका बजावली.
भारतीय संघ 305 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी संघाला वादळी सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून फक्त 15 षटकांत संघाचा धावसंख्या 114 पर्यंत नेला. रोहित आणि गिलमध्ये 136 धावांची सलामी भागीदारी झाली. खरं तर, रोहित आणि गिल यांनी भारताच्या विजयाचा पाया रचला होता. विराट कोहली पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.
श्रेयस अय्यरने गेल्या सामन्यात अर्धशतक ठोकले होते. कटकमध्ये 44 धावा काढल्यानंतर तो धावबाद झाला. अक्षर पटेल 41 धावांवर नाबाद राहिला, तर रवींद्र जडेजाने चौकार मारत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. टीम इंडियाकडूनही चांगली गोलंदाजी झाली, ज्यात रवींद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या.
या सामन्यात रोहित शर्माने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 32 वे शतक झळकावले. त्याने 119 धावांच्या खेळीत 12 चौकार आणि 7 षटकार मारले. रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे 49 वे शतक आहे. तो आता शतकांच्या अर्धशतकापासून फक्त एका मोठ्या डाव दूर आहे.
हेही वाचा –
IND vs ENG; हिटमॅनचे धमाकेदार शतक, वनडे मालिका भारताच्या खिशात
IND vs ENG; हिटमॅनचा धमाका! भारताचा दणदणीत विजय, इंग्लंडचा धोबीपछाड
हिटमॅनचा विक्रम! रोहितने पाँटिंगला मागे टाकत ODI क्रिकेटमध्ये रचला इतिहास