भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील चेन्नईच्या मैदानावरील दोन्ही कसोटी सामने झाले असून आता उर्वरित दोन सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे अहमदाबाद येथील पहिला सामना गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळवला जाणार आहे.
या सामन्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय बीसीसीआयने यापूर्वीच घेतला होता. त्यमुळे तिकीटविक्री देखील चालू झाली होती. आता या सामन्याची सगळी तिकिटे विकल्या गेल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे. तसेच आयपीएलच्या आगामी हंगामात प्रेक्षकांना प्रवेश देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही गांगुली यांनी सांगितले.
अहमदाबाद येथील दिवस-रात्र सामन्याची सगळी तिकिटे विकल्या गेली असून प्रेक्षक पुन्हा एकदा मैदानात येऊन सामना बघणार असल्याने मी आनंदी असल्याची प्रतिक्रिया गांगुली यांनी दिली. “चेन्नई येथील पहिल्या सामन्यातही दर्शकांना प्रवेश देण्याचा आमचा मानस होता. मात्र तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन याला राजी नसल्याने आम्ही त्यांच्या निर्णयाचा सन्मान केला”, असेही यावेळी गांगुली म्हणाले.
अहमदाबादला चेन्नईपेक्षा अधिक प्रेक्षक
चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडियमची आसन क्षमता कमी असल्याने फारसे लोकं सामना पाहण्यासाठी येऊ शकले नाहीत. मात्र मोटेरा स्टेडियमची प्रेक्षक क्षमता नव्या बांधकामामुळे तबल एक लाख दहा हजार झाली आहे. त्यामुळे पन्नास हजार लोकांना या सामन्यासाठी मैदानात येण्याची परवानगी आहे. एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षकांचा पाठिंबा मिळाल्याने भारतीय संघातही नवा उत्साह संचारेल.
चेन्नई येथील दुसऱ्या सामन्यातही प्रेक्षकांच्या उपस्थितीने वेगळाच माहोल तयार झाल्याचे दिसून आले होते. विशेषत: ‘लोकल बॉय’ आर अश्विनला स्थानिक प्रेक्षक जोरदार प्रोत्साहन देत होते. सामन्यानंतर देखील कर्णधार विराट कोहली आणि सामनावीर आर अश्विनने प्रेक्षकांच्या उपस्थितीचा फायदा झाल्याचे सांगत त्यांचे आभार मानले होते. त्यामुळे येत्या २४ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतही प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा लाभ घेत भारतीय संघ मालिका विजयाचा प्रयत्न करेल.
महत्वाच्या बातम्या:
बिग ब्रेकींग! दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
वयाच्या २८ व्या वर्षीच क्विंटॉन डीकॉकने घेतला मेंटल ब्रेक, या टी२० स्पर्धेला मुकणार
भारताने आम्हाला तिन्ही आघाड्यांवर मात दिली असली तरी, इंग्लिश कर्णधार जो रूटची प्रतिक्रिया