---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, ‘या’ कारणामुळे विराट कोहली प्लेइंग 11 मधून बाहेर 

---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघ नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आमनेसामने आहेत. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. तर विराट कोहली या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. या बातमीद्वारे जाणून की विराट कोहली नागपूर एकदिवसीय सामन्यात का खेळत नाहीये.

नाणेफेकीदरम्यान प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की विराट कोहली या सामन्यात टीम इंडियाचा भाग नाही. किंग कोहली न खेळण्याचे कारण सांगताना रोहित म्हणाला की काल रात्री त्याला गुडघ्याचा त्रास झाला होता. ज्यामुळे तो सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. आता सामन्यात विराट कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळतो हे पाहणे मनोरंजक असेल.

चाहते किंग कोहलीच्या एकदिवसीय सामन्यात पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत होते. कोहलीने ऑगस्ट 2024 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. आता कोहली मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भाग घेतो की नाही हे पाहणे मनोरंजक ठरेल.

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर, टीम इंडियाला 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही सहभागी व्हायचे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने विराट कोहली टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग असेल.

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांनी नागपूरमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याद्वारे या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी

इंग्लंड – बेन डकेट, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.

हेही वाचा-

दु:खद बातमी.! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे 74 व्या वर्षी निधन
IND vs ENG; इंग्लंडने जिंकला टाॅस, फलंदाजीचा निर्णय, टीम इंडियाच्या दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी
संघाला मोठा धक्का..! चॅम्पियन्स ट्राॅफीच्या तोंडावर अष्टपैलू खेळाडूने घेतली निवृत्ती

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---