---Advertisement---

IND vs ENG: पत्रकार परिषदेत कोणत्या गोष्टीवर चिडला बेन स्टोक्स? स्वतःच्या क्रिकेट बोर्डालाच फटकारलं

On: बुधवार, जुलै 30, 2025 6:20 PM
---Advertisement---

केनिंग्टन ओव्हलमध्ये एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. याठिकाणी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे कर्णधार बेन स्टोक्स शेवटच्या सामन्यात खेळणार नाही. त्याचबरोबर जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन आणि ब्रायडन कार्स हे वर्कलोडच्या दबावामुळे हा सामना खेळणार नाहीत. ओव्हल टेस्टपूर्वीच्या पत्रकार परिषदेत इंग्लंड संघाचा नियमित टेस्ट कर्णधार बेन स्टोक्स एका मुद्द्यावरून आपल्या क्रिकेट बोर्डवर नाराज दिसून आला.

चौथ्या आणि पाचव्या टेस्ट सामन्यांमधील फक्त 3 दिवसांचा ब्रेक होता. त्यामुळेच जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन आणि ब्रायडन कार्स यांना पुरेसा आराम मिळू शकला नाही. याच कारणामुळे त्यांना प्लेइंग 11 मधून बाहेर जावे लागले. शेड्यूलवर नाराजी व्यक्त करत बेन स्टोक्सने पत्रकार परिषदेत म्हटलं, “सामन्यांमधील अंतर 4-5 दिवसांचं असू शकलं असतं, दोन सामन्यांमध्ये 8-9 दिवसांचा ब्रेक होता आणि इतर दोनमध्ये खूप कमी. हे दोन्ही संघांसाठी कठीण होतं.” या कठीण वेळापत्रकामुळे जसप्रीत बुमराहही शेवटच्या टेस्टमधून बाहेर राहू शकतो. त्यामुळे टीम इंडियावरही याचा परिणाम होऊ शकतो.

गेल्या सामन्यात शेवटी हात मिळवण्यावरून थोडं वाद निर्माण झाला होता. या संदर्भात विचारल्यावर कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला, “जडेजा आणि वॉशिंग्टनने सामना त्या टप्प्यावर आणण्यासाठी खूपच छान खेळ केला. ते दोघं शतक का गाठू इच्छित होते, हे पूर्णपणे समजण्यासारखं आहे. आम्ही या गोष्टींवरून पुढे गेलो आहोत आणि आशा करतो की भारतही त्या 20 मिनिटांपासून पुढे जाईल. ही एक शानदार मालिका ठरली आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---