भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात सध्या तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिन्ही सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयोजित केले गेले आहेत. विशेष म्हणजे चाहते या सामन्यांचा आनंद विनामुल्य घेऊ शकत आहेत. मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (9 डिसेंबर) खेळला गेला. स्टेडियममध्ये मोफत प्रवेश असल्यामुळे चाहत्यांची गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले.
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील हा दुसरा टी-20 सामना शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. भारताला या सामन्यात मोठी धावसंख्या करता आली नाही. अवघ्या 80 धावांवर संघ सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात इंग्लंडने 6 विकेट्सच्या नुकसानावर हे लक्ष्य गाठले आणि सलग दुसरा विजय मिळवला. उभय संघांतील हा सामना लो स्कोरिंग असला, तरी सामना सुरू होताना आणि सामना संपल्यानंतर सामन्यासाठी चाहत्यांमध्ये असणारी उत्सुकता स्पष्टपणे पाहायला मिळाली.
The Wankhede Stadium was house full during the 2nd T20I match between India Women and England Women. ????️✨
It was an incredible sight to witness such amazing energy and support. ????????#MCA #Mumbai #Cricket #IndianCricket #Wankhede #BCCI pic.twitter.com/WWxzsUwI0R
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) December 10, 2023
एरवी महिला क्रिकेटकडे दुर्लक्ष करणारे चाहते, मोफत प्रवेश असल्यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्टेडियममधील गर्दीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पण यामुळे चाहत्यांची गौरसोय देखील मोठ्या प्रमाणात झाली. सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यात वानखेडे स्टेडियमच्या बाहेर झालेली गर्दी पाहायला मिळत आहे. काही चाहत्यांनी एमसीए आणि बीसीसीआयला अशी विनंतीच केली आहे की, “हवे तर तिकिटाचे पैसे घ्या, कारण चाहत्यांची गर्दी नियंत्रणात ठेवता येत नाहीये.”
Went to Wankhede stadium to watch #INDvsEng womens match.. but after coming here saw pathetic crowd management by BCCI & MCA.. Tum log Paisa lo yaar..paise leke ticket becho agar free ka crowd nahi manage hota tumse..bachhe aurte sab yaha waha bhaag rahe..stampede like situation pic.twitter.com/c9NkWTtDJM
— Ashok Rajpurohit (@ashok_apna_AK) December 9, 2023
दरम्यान, उभय संघांतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना रविवारी (10 डिसेंबर) खेळला जाणार आहे. या सामन्यालाही मोठ्या प्रमाणात चाहते गर्दीत जमण्याची शक्यता आहे. टी-20 मालिका संपल्यानंतर भारत आणि इंग्लंड महिला संघात एक कसोटी सामनाही खेळला जाणार आहे. 14 डिसेंबर पासून हा सामना मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. (IND vs ENG Women’s T20i Fans thronged the Wankhede gates as the stadium had free entry)
महत्वाच्या बातम्या –
WPL 2024 चे आयोजन फक्त एकाच राज्यात केले जाणार; जय शाह म्हणाले, ‘आमच्याकडे उत्तर प्रदेशसह…’
LLC 2023 । मणिपाल टायगर्सने पहिल्यांदा जिंकली ट्रॉफी, हरभजनकडून रैनाच्या संघाला फायनलमध्ये मात