भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांदरम्यान कानपूरमध्ये पहिली कसोटी सामना चालू आहे. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या सलामी फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. परंतु, तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत, पहिल्या डावात ४९ धावांची आघाडी मिळवून दिली. भारताला मोठी धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा पदार्पणवीर श्रेयस अय्यर याच्या पुढे मात्र आता नवा प्रश्न उभा राहिला आहे.
तर अय्यर नसेल पुढच्या कसोटी
श्रेयस अय्यर याने आपल्या पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले असले तरी, मुंबई येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी तो संघात असेल की नाही, याची शाश्वती नाही. कारण, भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली हा मुंबई कसोटीतून संघात पुनरागमन करेल. अशा परिस्थितीत शतक करूनही श्रेयस वर संघाबाहेर बसण्याची पाळी येऊ शकते.
विराट कोहली कानपूर कसोटीसाठी उपलब्ध नसल्याने अय्यरला कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले. अय्यरने शतक ठोकल्यानंतर आता सोशल मीडियावर आणि दिग्गज खेळांडूंमध्ये चर्चेला उधाण आले आहे. नेटकर्यांना आता अनेक प्रश्न पडले आहेत. अय्यरला बाहेर बसवून विराट अंतिम अकरामध्ये खेळेल का? संघात जागा बनवेल का? उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणार्या शतकवीर अय्यरला बाहेर बसवणं योग्य असेल का? असे प्रश्न चाहते विचारत आहेत.
नायरशी केली तुलना
चाहत्यांनी अय्यरचे नाव करूण नायरसोबत जोडले आहे. त्याने त्याच्या तिसऱ्याच सामन्यात त्रिशतक झळकावलं होतं. नायरने २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध चेन्नईमध्ये ३०३ नाबाद धावांची खेळी केली होती. मात्र, त्यानंतर त्याला फक्त २ कसोटी सामन्यात संधी देऊन संघातून वगळण्यात आलं. त्यामुळे चाहत्यांनी अय्यरचे नाव करुणसोबत जोडण्याचे कारण म्हणजे निवडकर्त्यांनी आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होते.
करुण नायरने खेळलेल्या ६ कसोटी सामन्यात ७ डावांत ६२.३३ च्या सरासरीने ३७४ धावा केल्या आहेत. ज्यात फक्त एका शतकाचा समावेश आहे. मात्र, ते देखील त्रिशतक होते. चाहते आजही त्रिशतक मारूनही त्याला संघाबाहेर का काढण्यात आले? त्याची त्रिशतक मारून काय चूक झाली? असे प्रश्न विचारत असतात.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान दौऱ्यासाठी वेस्ट इंडिज संघ जाहीर; ‘या’ बड्या खेळाडूंना नाही मिळाले स्थान
https://mahasports.in/brad-hogg-on-ms-dhoni-retention-by-chennai-super-kings/h
//mahasports.glteyepbzg-jqp3vl997450.p.temp-site.link/new-zealand-cricketer-takes-acrobatic-catch-in-domestic-cricket-watch-video/