---Advertisement---

टीम इंडियाला पराभूत करत न्यूझीलंडने रचला मोठा इतिहास

On: बुधवार, फेब्रुवारी 5, 2020 7:36 PM
---Advertisement---

हेमिल्टन। आज (5 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सेडन पार्क(Seddon Park) येथे पहिला वनडे सामना (ODI) पार प़डला. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात यजमान न्यूझीलंडने भारताचा 4 विकेट्सने पराभव केला. तसेच 1-0 अशी आघाडी घेतली.

या सामन्यात भारताने दिलेल्या 348 धावांचा यशस्वी पाठलाग करताना न्युझीलंडने 11 चेंडू राखून हा सामना जिंकला. त्यामुळे न्यूझीलंडकडून वनडेमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. याआधी न्यूझीलंडने वनडेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2007मध्ये हेमिल्टन येथेच 347 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

https://twitter.com/ICC/status/1225002384532877313

आजच्या सामन्यात न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज रॉस टेलरने (Ross Taylor) 84 चेंडूत नाबाद 109 धावा केल्या. यामध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. याबरोबरच कर्णधार टॉम लॅथम (Tom Latham)  आणि हेन्री निकोलस( Henry Nicholls) यांच्या अर्धशतकी खेळीने न्यूझीलंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यावेळी लॅथमने 48 चेंडूत 69 धावा तर निकोलसने 82 चेंडूत 78 धावा केल्या.

भारताकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur)  आणि मोहम्मद शमीने (Mohemmed Shami) प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करताना भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने 107 चेंडूत सर्वाधिक  103 धावा केल्या. यामध्ये 11 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. तर केएल राहूल(88) आणि कर्णधार विराट कोहलीने(51) अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 बाद 347 धावा केल्या होत्या.

न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना टीम साउदीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर कॉलिन डी ग्रँडहॉम (Colin de Grandhomme) आणि ईश सोधीने (Ish Sodhi) प्रत्येकी 1 विकेट घेतली.

न्यूझीलंडकडून वनडेत सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग – 

348 – विरुद्ध भारत, हेमिल्टन, 2020

347 – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, हेमिल्टन, 2007

337 – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऑकलँड, 2007

https://twitter.com/Maha_Sports/status/1225052083998482432

https://twitter.com/Maha_Sports/status/1225046166611492864

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---