भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND VS NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियमवर खेळवला जात आहे. किवी संघाचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करत आहे.
पुणे कसोटीत मोठा निर्णय घेत रोहित शर्माने तीन खेळाडूंना वगळले आहे. केएल राहुलसह मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. तर त्यांच्या जागी शुबमन गिल, आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात स्थान मिळाले आहे.
शेवटच्या कसोटीत केएल राहुलची कामगिरी काही खास नव्हती. बांग्लादेशविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत त्याने महत्त्वपूर्ण अर्धशतक नक्कीच झळकावले. पण न्यूझीलंडविरुद्ध त्याची कामगिरी चांगली झाली नाही. त्तपर्वी सामन्याच्या एक दिवस आगोदर हेड कोच गाैतम गंभीरने केएल राहुलबाबत बचावात्मक भूमिका घेतली होती. त्यामुळे या सामन्यात केएल राहुल खेळताना दिसेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही.
तर मोहम्मद सिराजने मागील 7 कसोटी सामन्यांमध्ये दुसऱ्या डावात एकही बळी घेतलेला नाही. पहिल्या डावातील त्याची कामगिरी सरासरीची होती. अशा परिस्थितीत त्याच्या जागी आकाशदीपला स्थान मिळाले आहे.
शानदार कामगिरी करुन देखील कुलदीप यादवला बाहेर करण्यात आले आहे. बेंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात त्याने तीन विकेट घेतल्या, पण त्याची इकाॅनमी 5.40 होती. दुसऱ्या डावात त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर संघात देण्यात आले आहे. ज्याने नुकतेच रणजी ट्रॉफीमध्ये शतक झळकावले आहे.
पाहा दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन-
भारत- यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड- टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, टिम साउथी, मिचेल सँटनर, एजाज पटेल, विल्यम ओरूरके
हेही वाचा-
IND VS NZ; पुणे कसोटीत किवी संघानं जिंकला टाॅस, केएल राहुलचा पत्ता कट, गिलचे पुनरागमन!
ind vs nz; न्यूझीलंडचाही इरादा स्पष्ट, कर्णधार म्हणाला, “आम्ही मागे राहणार ….”
श्रीलंकेची रेकाॅर्डब्रेक कामगिरी, टी20 पाठोपाठ वनडे मध्येही वेस्ट इंडिजला लोळवले