---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे किती वाजता सुरू होणार? सामन्यापूर्वी जाणून घ्या महत्वाची अपडेट..

On: मंगळवार, जानेवारी 13, 2026 2:14 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील IND vs NZ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिला सामना जिंकून टीम इंडियाने आघाडी घेतली आहे. आता, आणखी एका विजयासह, टीम इंडिया मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. दुसरा सामना फार दूर नाही. दरम्यान, मालिकेतील हा महत्त्वाचा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल हे जाणून घेऊया.

भारतीय संघाने या वर्षाला (2026) धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात कोणत्याही भारतीय फलंदाजाने शतक झळकावले नसले तरी, विराट कोहली, शुबमन गिल, रोहित शर्मा आणि उर्वरित भारतीय फलंदाजांच्या कामगिरीने भविष्यासाठी आशा निर्माण केल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना, न्यूझीलंडने बडोदा सामन्यात 300 धावांचा मोठा धावसंख्या उभारला, परंतु भारतीय संघाने तो सहजपणे गाठला. आता दुसऱ्या सामन्याची वेळ आली आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंडचा दुसरा एकदिवसीय सामना 14 जानेवारी रोजी राजकोट येथे खेळला जाईल.

एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना उद्या 14 जानेवारी रोजी खेळला जाईल. हा सामना राजकोट येथील निरंजन शाह स्टेडियमवर खेळला जाईल. सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. टॉस अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी 1 वाजता होईल, जर दोन्ही संघांनी त्यांचे पूर्ण 50 षटके खेळली तर सामना रात्री 10 वाजेपर्यंत संपेल.

भारतीय संघ राजकोटमधील दुसरा सामना जिंकून मालिका खिश्यात टाकण्याचा प्रयत्न करेल, तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ वेगवेगळे बदल करण्यासाठी प्रयत्न करेल. दरम्यान, न्यूझीलंडही हा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल, शेवटचा सामना 18 जानेवारी रोजी इंदूर येथील होळकर स्टेडियमवर खेळला जाईल.

न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी बदललेली टीम इंडिया:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आयुष बदोनी.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---