आज (8 फेब्रुवारी) इडन पार्क (Eden Park), ऑकलंड (Auckland) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) संघात 3 सामन्यांच्या द्विपक्षीय वनडे मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI Match) पार पडला. हा सामना न्यूझीलंडने 22 धावांनी (Won By 22 Runs) जिंकला आहे. तसेच मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे.
या सामन्यादरम्यान एका क्षणी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) संताप पहायला मिळाला होता. विराटच्या संतापाचा सामना कोणत्याही खेळाडूला नव्हे तर, सामन्यावेळी मैदानावर उपस्थित ऑस्ट्रेलियन पंच ब्रूस ऑक्सेनफोर्ड (Bruce Oxenford) यांना करावा लागला.
खरे तर डीआरएस (DRS) घेण्यासाठी खेळाडूंना 15 सेकंद मिळतात. पंरतु या वेळेनंतर ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज हेन्री निकोल्सने (Henry Nicholls) डीआरएस घेतला. ज्याला पंचाने मंजुरी दिली. त्यामुळे विराट पंचावर भडकला.
झाले असे की, न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करत असताना 17 वे षटक भारताचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल टाकत होता. या षटकातील 5वा चेंडू निकोल्सच्या पॅडवर जाऊन लागला. यावर भारतीय संघाने एलबीडब्ल्यूची जोरदार अपील केली आणि पंच ब्रूस यांनी बाद झाल्याचा इशारा दिला.
यानंतर डीआरएस घेण्याचा 15 सेकंदाचा वेळ सुरु झाला. या दरम्यान निकोल्सने आपला संघसहकारी मार्टिन गप्टीलबरोबर चर्चा करत असताना डीआरएस घेण्याची वेळ संपली.
ही वेळ संपल्यानंतर निकोल्सने डीआरएस घेतला आणि तो पंचाने मंजुर करत तिसऱ्या पंचाकडे पाठवला. नियमानुसार असे व्हायला नको होते. यामुळे विराट पंच ब्रूस यांच्यावर भडकला आणि त्यांच्याशी चर्चा करू लागला. परंतु, शेवटी हा निर्णय भारतीय संघाच्या पक्षात गेला.
या सामन्यात निकोल्स आणि गप्टीलने पहिल्या विकेटसाठी 16.5 षटकात 93 धावा केल्या. यामध्ये निकोल्सने 59 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 41 धावा केल्या.
विराट कोहलीच्या १२ वर्षांच्या वनडे कारकिर्दीत पहिल्यांदाच घडली ही नकोशी गोष्ट
वाचा👉https://t.co/fTdER82YMO👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 8, 2020
या कारणामुळे शेन वॉर्न 'बुशफायर क्रिकेट बॅश या सामन्यामधून पडला बाहेर…
वाचा- 👉https://t.co/zzbR674mwa👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #bushfireaustralia— Maha Sports (@Maha_Sports) February 8, 2020