रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) माऊंट माँगनुई येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात दुसरा टी20 सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा अक्षरश: घाम काढला. या सामन्यात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने विस्फोटक फलंदाजी करत भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय खेळाडूंनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. यावेळी फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 191 धावा केल्या. तसेच, न्यूझीलंडला 192 धावांचे आव्हान दिले.
Suryakumar Yadav's magnificent hundred helps India soar to a total of 191/6 🔥
Will New Zealand chase the target?
Watch the #NZvIND series live on https://t.co/MHHfZPQi6H (in select regions) 📺 pic.twitter.com/uOmFZ0zT0H
— ICC (@ICC) November 20, 2022
यावेळी भारताकडून फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने या सामन्यात 51 चेंडूत नाबाद 111 धावांची वादळी शतकी खेळी केली. या धावा करताना त्याने तब्बल 7 षटकार आणि 11 चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त फक्त इशान किशन (Ishan Kishan) याने 36 धावांचे योगदान दिले. तसेच, कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी प्रत्येकी 13 धावा चोपल्या. रिषभ पंत (Rishabh Pant) 6 धावांवर तंबूत परतला. दुसरीकडे, भारताचे तीन फलंदाज शून्य धावेवर तंबूत परतले.
यावेळी न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना टीम साऊदी याने सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 34 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने शेवटच्या षटकातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे हार्दिक पंड्या, दीपक हुड्डा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची हॅट्रिक विकेट घेतली. त्याच्याव्यतिरिक्त, लॉकी फर्ग्युसन याने 2 आणि ईश सोधी याने 1 विकेट घेतली.
हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडला 192 धावांचे आव्हान आहे. विशेष म्हणजे, या मालिकेतील पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. (ind vs nz 2nd t20 india scored 191 for 6 wickets new zealand got 192 target)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संजूबाबत अश्विनची भविष्यवाणी ठरली खरी! भारताकडून पंतच्या आधी टी20 पदार्पण करूनसुद्धा दुर्लक्षित
मैदानात उतरताच भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम, ऑस्ट्रेलियाला टाकले मागे