न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारतीय संघाने विजयी आघाडी घेतली आहे. आता या स्पर्धेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना मंगळवारी (दि. 24 जानेवारी) इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअम येथे होणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ इंदोर येथे पोहोचला आहे. दुसरीकडे, भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात दर्शनही घेतले. तसेच, बाबा महाकाल यांची भस्म आरती केली. याव्यतिरिक्त त्यांनी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा लवकर बरा होण्यासाठी प्रार्थनाही केली.
सूर्यकुमार यादवने केला बाबा महाकालचा अभिषेक
बाबा महाकाल (Baba Mahakal) मंदिरात भस्म आरती दर्शन केल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांनी बाबा महाकालचा जल अभिषेक केला. तेथील पंडितांनी हर हर महादेवचा जयजयकारही केला. महाकालचा आशीर्वाद घेण्यासाठी तिन्ही खेळाडूंनी यावेळी धोतर परिधान केले होते.
Madhya Pradesh | Indian cricketers Suryakumar Yadav, Kuldeep Yadav, and Washington Sundar visited Mahakaleshwar temple in Ujjain and performed Baba Mahakal's Bhasma Aarti. pic.twitter.com/nnyFRLMbfa
— ANI (@ANI) January 23, 2023
रिषभ पंतच्या आरोग्यासाठी केली प्रार्थना
भस्म आरतीनंतर सूर्यकुमारने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने सांगितले की, “महाकालचे दर्शन घेऊन चांगले वाटले. आम्ही रिषभ पंत (Rishabh Pant) लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली. त्याचे पुनरागमन आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आम्ही न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली आहे. आता त्यांच्याविरुद्धच्या अंतिम सामन्याची प्रतीक्षा आहे.”
We prayed for the speedy recovery of Rishabh Pant. His comeback is very important to us. We have already won the series against New Zealand, looking forward to the final match against them: Cricketer Suryakumar Yadav pic.twitter.com/2yngbYZXfb
— ANI (@ANI) January 23, 2023
मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील पहिला वनडे सामना हैदराबाद येथे खेळण्यात आला होता. या सामन्यात सूर्यकुमार यादव याने 26 चेंडूत 31 धावा केल्या होत्या. त्यात 4 चौकारांचाही समावेश होता. हा सामना भारताने 12 धावांनी जिंकला होता. तसेच, दुसऱ्या वनडेत भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला 108 धावांवर रोखले होते. तसेच, 8 विकेट्सने सामना खिशात घातला होता. आता या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना मंगळवारी (दि. 24 जानेवारी) इंदोर येथे खेळला जाणार आहे. (ind vs nz 3rd odi suryakumar yadav reached baba mahakal temple of ujjain see photos)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लगीनघाई! राहुल अन् अथियाच्या संगीत सेरेमनीचा व्हिडिओ व्हायरल; खंडाळ्यात किती वाजता घेणार सात फेरे?
फिटनेसमध्ये विराटपेक्षा कमी नाही फाफ, एसए20 लीगमधील पठ्ठ्याचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल