भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान सध्या मर्यादित षटकांच्या मालिका खेळल्या जात आहे. उभय संघांमधील सुरू असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाने विजय नोंदवत विजयी आघाडी मिळवली आहे. संघाच्या या कामगिरीनंतर अनेक जण कौतुक करताना दिसत आहेत. आता यामध्ये पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू व पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांचा ही समावेश झाला आहे.
भारतीय संघाने शनिवारी (21 जानेवारी) झालेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघावर एकतर्फी वर्चस्व गाजवले. न्यूझीलंडला केवळ 108 धावांवर सर्वबाद केल्यानंतर भारताने दोन गडी गमावत मिळालेले आव्हान पूर्ण केले. यासह भारताने मालिका देखील आपल्या नावे केली. तत्पूर्वी, हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यातही भारतीय संघाने विजय मिळवलेला.
भारतीय संघाच्या याच शानदार कामगिरीमुळे रमीझ राजा हे प्रभावित झाले. त्यांनी भारतीय संघाचे कौतुक करताना पाकिस्तान संघाला सल्लादेखील दिला. ते म्हणाले,
“भारतीय संघ मायदेशात नेहमीच कौतुकास्पद कामगिरी करतो. मी पाकिस्तानसह सर्वच संघांना सांगेल की, एका दर्जेदार संघाला आपल्या मायदेशात कसे हरवायचे हे सर्वांनी भारताकडून शिकण्यासारखे आहे. भारतीय संघ आपल्या देशात इतर संघांना अजिबात डोके वर काढू देत नाही.”
न्यूझीलंड संघ सध्या जागतिक वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. भारत दौऱ्याआधी त्यांनी पाकिस्तानमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली होती. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतरही न्यूझीलंड संघाने शानदार कामगिरी करत मालिका खिशात घातलेली. न्यूझीलंड संघाला आता आपले अव्वलस्थान अबाधित राखायचे असल्यास, इंदोर येथे होणारा भारताविरुद्धचा अखेरचा सामना त्यांना जिंकावा लागेल. ते हा सामना जिंकण्यात अपयशी ठरले तर, भारतीय संघ क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचेल.
(Ramiz Raza Said Every Team Learn From Team India How To Beat Top Side At Home)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्टंप्स मागे सोडून स्टीव स्मिथने मारला अनोखा शॉट, चेंडू टाकण्याआधी बॉलरही गोंधळला
केएल राहुलपाठोपाठ अक्षर पटेलही चढणार बोहल्यावर, जाणून घ्या कोण आहे अष्टपैलूची होणारी पत्नी