भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्याचे तीन दिवस पूर्ण झाले असून चाैथा दिवसाचा खेळ आजपासून सुरु होईल. तिसऱ्या दिवसअखेर टीम इंडिया दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरली होती.
आता चौथ्या दिवशी भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारून न्यूझीलंडला लक्ष्य द्यायचे आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे एकही चेंडू न खेळता दिवस रद्द करावा लागला. आता चौथ्या दिवशी पाऊस खलनायक ठरणार का? तर बंगळुरूचे आजचे हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.
बेंगळुरूमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी (19 ऑक्टोबर, शनिवार) पावसाची शक्यता आहे. जी टीम इंडियासाठी मोठी समस्या ठरू शकते. या पावसाचा न्यूझीलंडला फायदा होणार असून टीम इंडियाचे नुकसान होणार आहे. चौथ्या दिवशी जवळपास 25 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तीन दिवस संपल्यानंतरही टीम इंडियाची स्थिती फारशी चांगली नाही. अशा परिस्थितीत चौथ्या दिवशी पाऊस पडला तर टीम इंडिया गोत्यात येऊ शकते.
दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानावर उपस्थित असलेला भारतीय संघ अजूनही 125 धावांनी मागे आहे. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसअखेर 231/3 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये सर्फराज खान 70* धावांवर नाबाद आहे. तर विराट कोहली दिवसअखेर शेवटच्या चेंडूवर बाद झाला.
बेंगळुरू कसोटीत टीम इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात फक्त 46 धावांत सर्वबाद झाली. ज्यामध्ये संघाचे एकूण पाच फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात 402/10 धावा केल्या. अशाप्रकारे आता टीम इंडिया दुसऱ्या डावात 231/3 धावा करूनही 125 धावांनी मागे आहे. अश्या स्थितीत भारतीय संघासाठी चाैथा दिवस म्हत्तवाचा ठरणार आहे.
हेही वाचा-
बंगळुरूचे मैदान गाजवायचे असेल तर, रोहित सेनेला कराव्या लागतील या 5 गोष्टी
रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा विजय, आफ्रिकेविरुद्ध होणार जेतेपदाचा सामना
भारताला पाकिस्तानात निमंत्रित करण्यासाठी पीसीबीने वापरली नवी युक्ती! BCCI समोर ठेवली ही ऑफर