---Advertisement---

IND vs NZ: नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने, भारताला गोलंदाजीचे आमंत्रण

On: रविवार, मार्च 9, 2025 2:10 PM
---Advertisement---

(IND vs NZ Final Champions Trophy 2025) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यंदाच्या अंतिम लढतीत भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आले आहेत. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या महत्त्वाच्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच टीम इंडिया पहिल्या डावात गोलंदाजी करणार आहे. संपूर्ण जगाच्या नजरा या हाय-वोल्टेज सामन्यावर खिळल्या आहेत.

पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन- (IND vs NZ playing 11)

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड- रचिन रवींद्र (कर्णधार) विल यंग, केन विल्यमसन, डॅरेल मिशेल, टाॅम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, काइल जेमीसन, विल्यम ओरोर्के.

भारत-न्यूझीलंड संघाच्या वनडे क्रिकेटमधील हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही संघ 119 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये भारताचे वर्चस्व राहिले. भारताने 61 सामन्यात मिळवला, तर न्यूझीलंडने 50 सामन्यात विजय मिळवला आहे. दरम्यान भारताने 50 सामने गमावले, तर न्यूझीलंडला 61 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही संघातील 7 सामने अनिर्णित राहिले आहेत, तर 1 सामना बरोबरीत सुटला. (India vs New Zealand Head to Head Records In ODI)

हेही वाचा-

रोहित शर्मा निवृत्ती घेणार? सौरव गांगुलींच्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ
Champions Trophy 2025: मालिकावीर पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत 4 भारतीय, ICCची मोठी घोषणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---