---Advertisement---

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड पहिला वनडे फ्रीमध्ये कधी, कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर

On: शुक्रवार, जानेवारी 9, 2026 10:14 PM
IND-vs-NZ
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात 3 सामन्यांची वनडे (एकदिवसीय) मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी होणार असून दोन्ही संघ तयारीला लागले आहेत. विशेष म्हणजे, भारताकडून रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली मैदानात उतरणार आहेत. बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणारा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय पुरुष सामना ठरणार आहे.

सामना बडोदा येथे दुपारी 1:30 वाजता सुरू होईल तर, टॉस दुपारी 1:00 वाजता होईल त्याचबरोबर
लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार, स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डीडी स्पोर्ट्सवर मोफत पाहता येईल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुखापतीमुळे बाहेर असलेले शुबमन गिल (Shubman gill) आणि श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आता पूर्णपणे तंदुरुस्त झाले असून न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात ते खेळताना दिसतील.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (Playing XI): शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.

दोन्ही संघ खालीलप्रमाणे आहेत:
भारतीय संघ: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल.

न्यूझीलंड संघ: मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), आदित्य अशोक, क्रिस्टियन क्लार्क, जोश क्लार्कसन, डेव्हन कॉन्वे, जॅक फाउल्क्स, मिच हे, काईल जेमिसन, निक केली, जेडन लेनोक्स, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मायकेल रे, विल यंग.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---