भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार होती. परंतु साउथॅम्प्टनमध्ये जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे याचा फटका सामन्यालाही बसला आहे. यामुळे या सामन्यातील पहिला दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आयसीसीला ट्रोल करायला सुरुवात केली. याचबरोबर अनेक मिम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.
हा सामना शुक्रवारी भारतीय वेळेनुसार तीन वाजता सुरू होणार होता. तसेच या सामन्याचे नाणेफेक अडीच वाजता होणार होती. परंतु साउथॅम्प्टनमध्ये पाऊस सुरू असल्यामुळे सुरुवातीला पहिले सत्र रद्द करण्यात आले होते. त्यांनतर देखील परिस्थितीत सुधारणा न झाल्याने संपूर्ण दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. याची भरपाई करण्यासाठी आयसीसीने राखीव दिवसाची सोय केली आहे.
साउथॅम्प्टनमध्ये येल्लो अलर्ट लागु करण्यास आला आहे. याचा अर्थ असा की, पुढील काही दिवस देखील साउथॅम्प्टनमध्ये पाऊस पडू शकतो. हा सामना साउथॅम्प्टनमध्ये आयोजित करण्यापूर्वी भविष्यवाणी केली गेली होती की या सामन्यात पाऊस पडू शकतो. तरीदेखील आयसीसीने या सामन्याचे आयोजन साउथॅम्प्टनमध्ये केले आहे. अशातच पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आल्यानंतर, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडायला लागला आहे. (Ind vs NZ first session washed out due to rain questions raised on icc)
अनेकांनी आयसीसीला प्रश्न देखील विचारला आहे की, इतक्या मोठ्या सामन्याचे आयोजन साउथॅम्प्टनमध्ये का केले गेले, कारण साउथॅम्प्टनमध्ये कधीही पाऊस पडण्याची शक्यता असतो.
https://twitter.com/VijayKu98951456/status/1405815985848786946
Scenes in Southampton considering 🌧️. Rain #INDvsNZ #WTCFinal2021 #Southampton #WTCFinal #WTC21 #FridayThoughts #fridaymorning pic.twitter.com/GGAaHXcmLe
— वि शा ल (@_iamvish) June 18, 2021
https://twitter.com/Madan_Chikna/status/1405758033758617602?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1405758033758617602%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatoday.in%2Ftrending-news%2Fstory%2Frain-delays-india-vs-england-wtc-final-twitter-has-best-memes-1816653-2021-06-18
https://twitter.com/TanmaySonar_007/status/1405823064282066944
All of us are eagerly waiting for #wtc2021 to kick off today.
Meanwhile rain in Southampton to everyone: pic.twitter.com/6kg7bIll5K
— N (@definitely_7not) June 17, 2021
यापूर्वी देखील आयसीसीला ट्रोल करण्यात आले होते, जेव्हा २०१९ विश्वचषक स्पर्धेत पावसामुळे अनेक सामने खेळविताना अडथळा निर्माण झाला होता. याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सेमी फायनलच्या सामन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. ज्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
यावेळी मात्र भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे हा सामना जिंकून पहिली वहिली आयसीसी ट्रॉफी आपल्या नावावर करण्याची नामी संधी चालून आली आहे. आतापर्यंत तो आयसीसीच्या स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळे विराटसह भारतीय संघ यावेळी पुर्णपणे विजयाच्या दृष्टीनेच मैदानात उतरणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
WTC Final 2021: पावसाचा खेळ सुरुच राहिल्याने पहिल्या दिवसाचा खेळ रद्द
WTC Final: पावसामुळे चिंतेचे कारण नाही, आयसीसीची ही तरतुद भरून काढणार वाया गेलेला वेळ
७५ कोटींची कार अन् करोडोंची घड्याळ! जाणून घ्या जगातील सर्वात महागडी लाईफस्टाईल जगणाऱ्या खेळाडूबद्दल