पाकिस्तान सुपर लिगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्स व लाहोर कलंदर या सामना दरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी व पाकिस्तानचा पूर्व कर्णधार सरफराज अहमद यांच्या दरम्यान शाब्दिक चकमक झाली. पंच व बाकी खेळाडू यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. आता झाल्या प्रकारावर शाहीन आफ्रिदी याने अखेर मौन सोडले असून झालेला प्रकार भावनेच्या भरात घडला असून सर्फराज अहमद या सारख्या वरिष्ठ खेळाडू बद्दल नेहमीच आदर वाटतो, असे मत व्यक्त केले.
झाले असे की, सामन्यादरम्यान क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या डावातील १९व्या षटकात वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदीने सर्फराज अहमदला एक जोरदार बाउन्सर टाकला. तो चेंडू सरळ सर्फराझच्या डोक्यावर जाऊन लागला. तरीही त्याने कसाबसा चेंडू मारला आणि एक धाव घेतली. परंतु हेल्मेटवर चेंडू लागल्यानंतर सर्फराज अचानक चिडला व त्याने शाहीन अफ्रिदीला काही अपशब्द म्हटले. हे ऐकून शाहीन अफ्रिदी ऐकून चिडला व रागात तो सर्फराजकडे गेला. पुढे तो वाद एवढा वाढला की, पंच व खेळाडूंना मध्यस्ती करत त्यांना शांत करावे लागले.
पाकिस्तान गोलंदाज शाहीनने झाल्या प्रकारावर आता पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असून आपली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. “सर्फराज आपल्या सर्वांसाठी अभिमान आहे. झालेला प्रकार भावनेच्या भरात घडला आहे. मी माझ्या वरिष्ठ सहकाऱ्यांचा नेहमीच आदर करतो. त्याच्या भविष्यसाठी प्रार्थना करतो,” अशी भावना व्यक्त केली आहे.
https://twitter.com/zorawarrr/status/1404815093624414210?s=20
हा प्रकार जेव्हा मैदानावर घडला तेव्हा शाहीनने केलेल्या कृतीमुळे त्याला टीकेचा सामना करायला लागला होता. पण आता दोन्ही खेळाडूमधील वाद मिटला असल्याचे बोलले जात आहे.
क्वाटा ग्लेडिएटर व लाहोर कलंदरमधे झालेल्या या सामन्यात क्वेटा ग्लॅडिएटर्सने लाहोर कलंदरवर १८ धावांनी शानदार विजय मिळवला होता. सलग दोन सामने गमवल्यानंतर लाहोर कलंदरचा पुढील सामना कराची किंग्ज शी होणार आहे. शाहीन आफ्रिदीसाठी पाकिस्तान सुपर लीगचा चालू हंगाम उत्तम राहिला असून ७.१ च्या सरासरीने ८ सामन्यात १२ बळी मिळविले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
संधी मिळताच फलंदाजांने धारण केला ‘रुद्रावतार’, ४ चेंडूत ठोकले सलग ४ षटकार
बॉबी देओलच्या फिट बॉडीवर ‘या’ खेळाडूची पत्नीही फिदा; म्हणाली, ‘माझ्या नवऱ्यालाही टिप्स द्या’
WTC Final: एमएस धोनीला ‘या’ विक्रमात मागे टाकत विराट कोहली पटकवणार अव्वल स्थान