क्रिकेट आणि बॉलीवूडचं खूप जुनं नातं आह., अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली, हरभजन सिंग, युवराज सिंग आणि झहीर खान अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि क्रिकेटपटू हे एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसतात. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे.
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने सोशल मीडियावर शर्टलेस व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अझर महमूदची पत्नी इब्बा कुरेशीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने आपल्या पतीला बॉबी देओलकडून प्रेरणा घेण्यास सांगितले आहे. (Actor Bobby Deol Post A Shirtless Video On Twitter Azhar Mahmood Wife React)
झालं असं की, बॉबीने 15 जूनला रेस 3 सिनेमाच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनिम्मित ट्विटरवर एक खास व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो शर्टलेस असून आपल्या शॉटविषयी बोलत आहे.
व्हिडिओमध्ये बॉबीने सर्वांचे आभार मानले आहेत. बॉलिवूड अभिनेत्याने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अझर महमूदची पत्नी इब्बाने कंमेंट करत या अभिनेत्याला सुदृढ शरीरासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर लिहिले की, “अरे देवा. तुमचे वय दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. कृपया अझरलाही काही टिप्स द्या.”
Omg Bobby ! You reversing in age !!! Tips please for @AzharMahmood11 ????
— Ebba Qureshi (@EbbaQ) June 15, 2021
आपली पत्नी इब्बाच्या कंमेंटवर अजहरने देखील प्रतिक्रिया दिली. तसेच बॉबीला आपली दुःखदायक कहाणी ऐकवली. त्याने पंजाबीत कंमेंट केली की, “बॉबी यार मारलंच तू आता…’
Bobby yaar marwaditta na …
— Azhar Mahmood (@AzharMahmood11) June 15, 2021
अझरची कंमेंट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अझरच्या कमेंटवर उत्तर देताना बॉबीने लिहिले की, “माफ कर अजी (अझर), इब्बा ही माझ्याविरुद्धची एक शर्यत आहे… आशा आहे की तुम्ही लोक सुरक्षित आहात.”
Sorry yaar Azzy ???? .. @EbbaQ It’s a race against time ???? …
Hope you guys are staying safe!
— Bobby Deol (@thedeol) June 15, 2021
अझरने पाकिस्तान संघाकडून 21 कसोटी सामने खेळताना 39 बळी आणि 900 धावा केल्या आहेत. दुसरीकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये 143 सामन्यांत 123 बळी घेण्यात तो यशस्वी ठरला आहे. अझरने देशांतर्गत टी20 कारकिर्दीत 230 सामने खेळत 258 बळी आपल्या नावावर केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
WTC Final: कोहली अन् शास्त्रींची प्लेइंग इलेव्हनची निवड फसली? साउथम्पटनची खेळपट्टी करतेय इशारा
नादच खुळा! अश्विन- जडेजाची जोडी बनेल भारतीय संघासाठी ब्रह्मास्त्र, ३५ कसोटीत घेतल्यात ३६२ विकेट्स
भारत-न्यूझीलंड फायनलवर संकटाचे ‘काळे ढग’, पहिल्या दिवसाचा खेळ उशिरा सुरू होण्याचे संकेत