---Advertisement---

ind vs nz; विराट कोहलीच्या बालेकिल्ल्यात हिटमॅनच्या नारा, पाहा VIDEO

---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहेत. या सामन्यात टीम इंडिया हळूहळू पुनरागमन करताना दिसत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट कोहलीच्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजेच बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावाने घोषणाबाजी केली जात आहे.

केएल राहुल सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान राहुल चाहत्यांना हात दाखवतो आणि त्यानंतर स्टेडियममध्ये रोहित शर्माच्या नावाने घोषणाबाजी सुरू झाली.

व्हिडिओमध्ये चाहत्यांनी ‘इंडिया राजा.. रोहित शर्मा…, असे नारे दिले. हळूहळू चिन्नास्वामींचे संपूर्ण स्टेडियम या घोषणांनी गुंजताना पाहायला मिळाले. याआधीही मुंबईतील वानखेडेमध्ये अशा घोषणा अनेकदा ऐकायला मिळाल्या आहेत. वानखेडेवर ‘मुंबईचा राजा कोण?’ रोहित शर्मा अशा घोषणा दिल्या जातात. आता भारतीय चाहत्यांनी या घोषणांमध्ये थोडा बदल केला, ज्यामध्ये मुंबईच्या जागी ‘इंडिया का राजा’ ने घेतली.

पाहा व्हिडिओ-

सामन्याच्या चौथ्या दिवशी सर्फराज खानने शानदार खेळी करत शतक झळकावले. त्याने 195 चेंडूत 09 चौकार आणि 04 षटकारांच्या मदतीने 150 झळकावले. टीम इंडियाकडे मोठी आघाडी असताना सर्फराजच्या बॅटमधून हे मोलाचे शतक आले. सर्फराजने कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 136 (163 चेंडू) धावांची भागीदारी केली.  तर रिषभ पंतसोबत त्याने 177 धावांची भागीदारी केली. आता रिषभ पंतसोबत केएल राहुल क्रीजवर उपस्थित आहे. दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे पुन्हा एकदा सामन्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. आता हा सामना कुठे संपतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा-

गेल्या 10 वर्षात अशी कामगिरी करणारा सर्फराज पहिलाच, शतक झळकावून रचला इतिहास
शुबमन गिलच्या स्थानाला धोका? अष्टपैलू खेळाडूनं तिसऱ्या क्रमांकावर ठोकलं शतक
सरफराजनंतर श्रेयस अय्यरचा धमाका! तुफानी शतक ठोकून दिलं निवडकर्त्यांना उत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---