न्यूझीलंडने भारत दौऱ्यावर आतापर्यंत चमकदार कामगिरी केली असून, तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत किवी संघ सध्या 2-0 ने पुढे आहे. न्यूझीलंडला बेंगळुरू आणि पुण्यात केन विल्यमसनची साथ मिळाली नाही. तिसऱ्या कसोटीसाठी विल्यमसन न्यूझीलंड संघात सामील होईल असे मानले जात होते. परंतु आता तो मुंबईत 1 नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या सामन्यातूनही बाहेर पडला आहे. न्यूझीलंडने अधिकृतपणे माहिती दिली आहे की विल्यमसन भारतात येणार नाही आणि दुखापतीतून बरे होण्याची प्रक्रिया मायदेशात करेल. जेणेकरून तो इंग्लंड मालिकेसाठी तंदुरुस्त होईल.
न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन श्रीलंका दौऱ्यात कंबरेच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. याच कारणामुळे तो भारताविरुद्धच्या मालिकेसाठी इतर खेळाडूंसोबत आला नाही. त्यानंतर पहिल्या कसोटीतून बाहेर पडला. शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी तो उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती. पण आधी तो पुण्यात होणाऱ्या सामन्यातून बाहेर पडला आणि आता तो मुंबईत होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही.
BIG BLOW FOR NEW ZEALAND. 📢
– Kane Williamson ruled out of the third Test against India. pic.twitter.com/kaCTpzatqs
— Johns. (@CricCrazyJohns) October 29, 2024
मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, केन विल्यमसन जर मुंबई कसोटीपासून बाहेर राहिला तर त्याला इंग्लंड मालिकेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होण्यास मदत होईल. पुढे तो म्हणाला, “केनने चांगली चिन्हे दर्शविली आहेत. परंतु तो आमच्यात सामील होण्यास तयार नाही. जरी गोष्टी आशादायक असले तरी आम्हाला वाटते की त्याने न्यूझीलंडमध्येच राहणे आणि त्याच्या पुनर्वसनाच्या अंतिम भागावर लक्ष केंद्रित करणे हेच त्याच्यासाठी सर्वोत्तम निर्णय आहे. इंग्लंडच्या मालिकेला अजून एक महिना बाकी आहे आणि आशा आहे की तो क्राइस्टचर्च कसोटीत भाग घेण्यास तयार असेल.”
न्यूझीलंड संघाने केन विल्यमसनच्या अनुपस्थितीचा भारत दौऱ्यावर फारसा परिणाम होऊ दिला नाही आणि जबरदस्त कामगिरी करत मायदेशात पहिल्यांदाच कसोटी मालिकेत टीम इंडियाचा पराभव केला. तिसरी कसोटी जिंकून न्यूझीलंड रोहित शर्मा अँड कंपनीचा सफाया करण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा-
वनडे मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (टाॅप-5)
IND vs NZ: रोहित शर्माची प्रतीक्षा संपणार, 11 वर्षांनंतर हिटमॅन घरच्या मैदनावर परतणार
IPL 2025; केकेआर आपल्या मॅचविनर खेळाडूलाच काढून टाकणार? उत्कृष्ट कामगिरीवर पाणी….