भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (01 नोव्हेंबर) पासून खेळवला जात आहे. क्लीन स्वीप रोखण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. कारण किवी संघ तीन कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. दरम्यान आता मुंबई कसोटीत किवी संघाचा कर्णधार टाॅम लॅथमने टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच टीम इंडिया पहिल्या डावात गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याच्या उद्देशातून भारतीय संघाला आजचा सामना जिंकणे सर्वात म्हत्वाचा आहे. या निर्णायक सामन्यात वरिष्ठ खेळाडूंकडून मोठी खेळीची अपेक्षा असणार आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाल्यास या सामन्यासाठी जसप्रीत बुमराह उपल्बध नसल्याने मोहम्मद सिराज खेळताना दिसणार आहे. तर किवी संघात ईश सोढी आणि मॅट हेन्री यांचा समावेश करण्यात आले आहे.
पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग-11
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, इश सोधी, मॅट हेन्री, एजाज पटेल, विल्यम ओरोरके
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज
कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास पहिल्या दोन सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. पहिल्या कसोटीत बेंगलोरमध्ये भारताला 8 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर पुणे कसोटीत टीम इंडिया 113 धावांनी हरली.
हेही वाचा-
IPL 2025; रिषभ पंत, केएल राहुलपासून मोहम्मद शमी, श्रेयस अय्यरपर्यंत, मेगा लिलाव होणार अतिसुंदर
मुंबई कसोटीपूर्वी भारताची चिंता वाढली, आफ्रिकेच्या विजयाने WTC गुणतालिकेत मोठे बदल!
विराटला मागे टाकत, हा फलंदाज आयपीएलमधील दुसरा सर्वात महागडा खेळाडू