भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा शेवटचा साखळी सामना आज, 2 मार्च 2025 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात किवी संघाने टाॅस जिंकला आहे. मिचेल सँटनरने टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आहे.
दोन्ही संघांनी त्यांच्या आधीच्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. आजच्या सामन्यातील विजयामुळे ‘अ’ ग्रुपमध्ये अव्वल स्थान कोणाला मिळेल, ज्यामुळे उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्ध्याचा निर्धार होईल.
प्लेइंग इलेव्हन बद्दल बोलायचे झाल्यास दोन्ही संघात एक-एक बदल करण्यात आले आहे. टीम इंडियामध्ये हर्षित राणाच्या वरुण चक्रवर्तीला संधी मिळाली आहे. तर किवी संघात डॅरिल मिचेलचा समावेश करण्यात आला आहे.
दोन्ही संघाच्या प्लेइंग 11
भारत-: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड-: विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरोर्क
हेही वाचा-
“जाता-जाता आणखी एक…”, अनुभवी खेळाडूची विराट-रोहितला विशेष मागणी!
विराटसाठी 2 मार्च खास, 2008 मध्ये केलेला हा पराक्रम, आजही सामना गाजवणार?
IMLT20: राहुल शर्माची हॅट्ट्रिक, रायुडूचा तडाखा, इंडिया मास्टर्सचा दमदार विजय!






