भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने जबरदस्त फटकेबाजी केली. विराटला या मालिकेतील कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, या मालिकेत विराटने त्याच्या वनडे कारकीर्दीतील 46वे शतक झळकावून सर्वांच्या भुवया उंचावल्या. आता प्रत्येक चाहत्याला भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतही विराट त्याच अंदाजात फलंदाजी करेल अशी आशा आहे. महत्त्वाचं म्हणजे, या मालिकेत विराटकडे मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधीदेखील आहे.
विराटच्या निशाण्यावर सेहवाग आणि पाँटिंगचा विक्रम
खरं तर, भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
विराट कोहलीची न्यूझीलंडविरुद्धची आकडेवारी शानदार राहिली आहे. त्याने न्यूझीलंड संघाविरुद्ध वनडेत 5 शतके ठोकली आहेत. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सेहवाग आणि पाँटिंगच्या संयुक्तरीत्या अव्वलस्थानी आहेत. या दोघांनीही न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी 6 शतके झळकावली आहेत. पाँटिंगने न्यूझीलंडविरुद्ध 51 सामन्यात 6 शतके केली आहे, तर सेहवागने 23 सामन्यात 6 शतके केली आहेत. यानंतर दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा सनथ जयसूर्या असून त्याने 47 सामन्यात 5 शतके केली आहेत.
याव्यतिरिक्त तिसऱ्या स्थानी विराट कोहली आहे. त्याने 26 सामन्यात 5 शतके केली आहेत, तसेच, चौथ्या स्थानी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) असून त्याने 42 सामन्यात 5 शतके केली आहेत. अशात विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत 2 शतके ठोकताच तो सचिनसह सेहवाग आणि पाँटिंगचा विक्रम मोडेल. (ind vs nz odi series 2023 virat kohli may breaks virender sehwag and ricky ponting this record)
याव्यतिरिक्त विराटकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25000 धावा करण्याचीही संधी आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत 119 धावा करताच, तो आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 25000 धावांचा टप्पा पार करेल. असे करणारा तो सहावा फलंदाज बनेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर-34,357 धावा (664 सामने)
कुमार संगकारा-28,016 धावा (594 सामने)
रिकी पाँटिंग- 27,483 धावा (668 सामने)
माहेला जयवर्धने- 25,957 धावा (725 सामने)
जॅक कॅलिस – 25,534 धावा (617 सामने)
विराट कोहली- 24,881 धावा (487 सामने)*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘असं वाटलं माझ्याच मुलाला…’, रिषभ पंतच्या अपघातावर माजी निवडकर्त्याचं भावूक वक्तव्य
गेम ऑन! वनडे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी रोहितने नेट्समध्ये गाळला घाम, व्हिडिओत दिसले जबरदस्त फटके