---Advertisement---

कॅप्टन गिलकडून जडेजाची पाठराखण! म्हणाला, “त्याच्यामुळे नाही हरलो, तो तर…”

On: सोमवार, जानेवारी 19, 2026 3:58 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचा १-२ असा दारूण पराभव झाला. घरच्याच मैदानावर झालेल्या या निराशाजनक कामगिरीचे खापर भारताच्या अनेक खेळाडूंवर फोडले जात आहे. ही मालिका भारताचा अनुभवी खेळाडू रविंद्र जडेजासाठी निराशाजनक राहिली. यामुळे तो संघाच्या पराभवाला जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

या मालिकेत जडेजा फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही अपयशी ठरला. या मालिकेतील तिन्ही सामन्यात त्याला संघाच्या अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले होते. त्यामध्ये त्याने फलंदाजीत १४.३३च्या सरासरीने ४३ धावा केल्या, तर एकही विकेट घेतली नाही.

पहिल्या दोन सामन्यात निराशा झाल्यानंतर इंदौरच्या सामन्यात तरी जडेजा उत्तम कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. या सामन्यात संघाची स्थिती ५ बाद १५९ अशी असताना त्याच्या बॅटमधून धावा निघतील असे वाट असताना तो केवळ १२ धावा करत बाद झाला. हा सामना भारताने ४१ धावांनी गमावला. ज्यामध्ये विराट कोहलीने १२४ धावा केल्या.

“केवळ जडेजामुळे संघ हरला नाही, तर त्यासाठी सर्वच खेळाडू जबाबदार आहेत”, असे भारताचा कर्णधार शुबमन गिलने सामन्यानंतर म्हटले आहे.

तिसऱ्या वनडे सामन्यानंतर गिल पत्रकार परिषदेत बोलत होता. यामध्ये तो म्हणाला, “जडेजा चांगल्या लयीत होता. चूक केवळ त्याची नसून आमचे काही फलंदाजही चांगली सुरूवात करून मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.”

गिलने जडेजाच्या फलंदाजीबाबत पाठराखण केली मात्र गोलंदाजीत त्याची जादू चालली नाही याबद्दलही तो म्हणाला, ” मागील काही वर्षापासून तो संघासाठी महत्वाचा खेळाडू राहिला आहे. या मालिकेत त्याला विकेट काढण्यात यश आले नाही, असे होत असते. अशा गोष्टींमधून आपण काहीतरी शिकू आणि पुढे जाऊ.”

विशेष म्हणजे जडेजाने २०१३पासून वनडेत अर्धशतकही केलेले नाही. त्यातच त्याच्या न्यूझीलंड विरुद्धच्या खराब कामगिरीनंतर संघातील जागेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. आगामी सामन्यांसाठी संघ निवडकर्त्यांपुढे अक्षर पटेल हा पर्याय उपलब्ध आहे.

अक्षर सध्या भारताच्या टी२० संघाचा उपकर्णधार असून त्याने स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसेच त्याने भारताकडून ७१ वनडे सामने खेळलेले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---