भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 1 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. गेल्या दोन कसोटीतील पराभवामुळे भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे. ज्यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला मालिकेतील तिसरा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. तसेच या सामन्यात भारताच्या सर रवींद्र जडेजाला वानखेडेमध्ये झहीर खानला मागे टाकण्याची संधी आहे.
जडेजा कसोटीत सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत माजी दिग्गज झहीर खानला मागे टाकण्यापासून फक्त तीन विकेट्स दूर आहे. आता तिसऱ्या कसोटीत जडेजा तीन विकेट घेण्यात यशस्वी ठरला तर तो झहीरला मागे टाकेल. झहीर खानने कसोटीत 311 विकेट घेतल्या आहेत. तर आता सध्या जडेजाच्या नावावर 309 विकेट आहेत. इशांत शर्मानेही कसोटीत 311 विकेट घेतल्या आहेत. म्हणजे जडेजाने तीन विकेट घेताच तो इशांत शर्मा आणि झहीर खान दोघांना मागे टाकेल. असे केल्याने जडेजा भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा पाचवा भारतीय गोलंदाज ठरेल.
सध्या अनिल कुंबळेच्या नावावर भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स आहेत. कुंबळेने कसोटीत 619 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर अश्विनच्या नावावर 533 विकेट्स आहेत. यानंतर कपिल देव तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कपिलने त्यांच्या कसोटी कारकिर्दीत 434 विकेट घेतल्या. यानंतर हरभजन सिंगची पाळी येते. भज्जीने आपल्या कसोटी कारकिर्दीत 417 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीने कसोटीत 310 विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच दोन विकेट घेतल्यानंतर जडेजा ब्रेट लीच्या पुढे जाईल.
हेही वाचा-
IND VS NZ; मुंबईत 12 वर्षांपासून भारत अजिंक्य, वानखेडेवर वानखेडेवर बलाढ्य कामगिरी!
IND vs NZ; मुंबई कसोटीतून अनुभवी खेळाडू बाहेर, न्यूझीलंडला मोठा फटका
वनडे मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (टाॅप-5)